Bridge Demolition in Chandni Chowk : चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या कामाला आजपासून सुरवात

author img

By

Published : Sep 12, 2022, 2:31 PM IST

Bridge  in Chandni Chowk

पुण्याच्या चांदणी चौकातील पुल पाडण्याची तयारी सुरु झाली ( Bridge Demolition in Chandni Chowk ) आहे. त्यासाठी पुलाच्या भिंतींमधे स्फोटकं भरावी लागणार आहेत. त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रीलींग करुन होल्स पाडण्याचं काम सुरु झालं आहे. स्फोटानंतर अवघ्या आठ दे दहा सेकंदांमधे हा पुल पाडला जाणार ( demolition of bridge work start from today ) आहे.

पुणे: पुण्याच्या चांदणी चौकातील पुल पाडण्याची तयारी सुरु झाली ( Bridge Demolition in Chandni Chowk ) आहे. त्यासाठी पुलाच्या भिंतींमधे स्फोटकं भरावी लागणार आहेत. त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रीलींग करुन होल्स पाडण्याचं काम सुरु झालं आहे. स्फोटानंतर अवघ्या आठ ते दहा सेकंदांमधे हा पुल पाडला जाणार ( demolition of bridge work start from today ) आहे.


वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते देण्यात आले आहेत. पुढील प्रमाणे वाहतूक व्यवस्था असणार आहे. नॅशनल डिफेन्स अँकॅडमी (NDA) आणि मुळशीकडून पाषाण, बावधन, कोथरूड आणि वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने बांधण्यात आलेल्या फ्लायओव्हर क्रमांक 1 वरून सोडण्यात येणार आहे. एनडीए, मुळशी येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक फ्लायवे क्रमांक 7 वरून फ्लायओव्हर क्रमांक 3 मार्गे सोडण्यात येईल. इतर रस्त्यांवरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

मुंबईहून कोथरूडकडे जाणारी वाहतूक सध्याच्या कोथरूड मार्गाने वळवण्यात येणार आहे. कोथरूड ते मुंबई वाहतूक कोथरूड भुयारी मार्गाने वेद विहारकडे जाईल. कोथरूडकडून सातारा, वारजेकडे जाणारी वाहतूक वेदविहार सर्व्हिस रोडवरील शृंगेरी मठाजवळ महामार्गावरून वळवण्यात येणार आहे. दिलेली वाहतूक वळवण्याची योजना तात्पुरत्या कालावधीसाठी आहे. जेव्हा चांदणी चौकातील जुना पूल ( bridge in Chandni Chowk ) पाडला जाणार आहे. नंतर जुना पूल पाडल्यावर त्यावेळचे नवे मार्ग आणि वळण सार्वजनिक वापरासाठी प्रकाशित केले जातील, अशी माहिती NHAI पुणे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूलाची उभारणी पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात ( demolition of bridge ) येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यात येणार आहे.


पूल पडल्याने जो राडारोडा तयार होणार आहे, तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत. या कालावधीत मुंबईहून - पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता द्यावा लागणार आहे. नवीन उड्डाणपूलाची पाषाण- बावधन कडे लेन तयार झालेली असली, तरी जुना पुल पाडण्यासाठी मुंबईहून- पुण्याकडे येणाऱ्या महामार्गास एनएचएआय ला पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.