राज्यात एकूण 14 कोटी नागरिकांचे लसीकरण, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के

author img

By

Published : Jan 13, 2022, 3:25 PM IST

Updated : Jan 13, 2022, 4:35 PM IST

14 crore people vaccinated in maharashtra

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. तर, दुसरीकडे राज्यात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात होत असून, राज्यात एकूण 14 कोटी लोकांचे लसीकरण ( Covid vaccination Maharashtra ) झाले आहे.

पुणे - राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. तर, दुसरीकडे राज्यात लसीकरण ( Covid vaccination Maharashtra ) देखील मोठ्या प्रमाणात होत असून, राज्यात एकूण 14 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. यात पाहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण हे 90 टक्के असून, दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 62 टक्के आहे. ही माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई ( state vaccination officer Dr Sachin Desai ) यांनी दिली.

डॉ. सचिन देसाई यांच्याशी बातचीत करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Rules for Using Mask :...असा वापरा मास्क! अन्यथा कोरोना संसर्ग अटळ

कोविशिल्डचा साठा हा राज्यात 1 कोटीपेक्षा अधिक

वाढत्या कोरोनाच्या पर्श्वभूमीवर लसीकरण ( Covid vaccination Maharashtra ) मोठ्या प्रमाणात होत असून राज्यात लसीचा साठा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, कोविशिल्डचा साठा हा राज्यात 1 कोटीपेक्षा अधिक आहे. तर, कोव्हॅक्सिनचा साठा हा 16 लाखांपेक्षा जास्त उपलब्ध आहे. वेळोवेळी केंद्र सरकारकडे लसीच्या पुरवठ्याच्याबाबतीत पाठपुरावा केला जात आहे. आणि केंद्र सरकार देखील लसीचा साठा उपलब्ध करून देत आहे, असे देखील देसाई ( state vaccination officer Dr Sachin Desai ) म्हणाले.

'या' जिल्ह्यांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न देखील केले जात आहे. पण, राज्यात आजही काही जिल्हे असे आहेत जिथे लसीकरण हे खूप कमी प्रमाणात झालेले आहे. राज्यातील 12 जिल्हे असे आहेत जिथे आजही पहिल्या डोसच्या बाबतीत 80 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेले आहे. त्यात प्रामुख्याने नंदुरबार, बीड, नांदेड, धुळे, अकोला, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर राज्यात काही जिल्हे असेही आहेत जिथे लसीकरण हे सर्वाधिक झाले आहे. त्यात प्रामुख्याने पुणे, मुंबई, भंडारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे, असे देखील यावेळी डॉ. सचिन देसाई म्हणाले.

15 ते 18 वयोगटातील मुलांचे 36.02 टक्के लसीकरण

नुकतेच 15 ते 18 वयोगटांसाठी लसीकरणाला सुरवात झाली असून, राज्यात आत्तापर्यंत 21 लाख 83 हजार 976 म्हणजेच, 36.02 टक्के लसीकरण झाले आहे. तर, राज्यात 81 हजार हेल्थ केअर वर्कर, 50 हजार फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांपुढील 40 हजार ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात आले आहे, असे देखील यावेळी देसाई म्हणाले.

हेही वाचा - Tanaji Sawant On BJP Joining : भाजपात जाणार का? शिवसेना उपनेते म्हणाले, .. तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल

Last Updated :Jan 13, 2022, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.