Saptashringi Mata : सप्तशृंगी मातेच्या शेंदुर काढलेल्या मूर्तीवर आता अभिषेक होणार नाही

author img

By

Published : Sep 23, 2022, 8:06 PM IST

Updated : Sep 23, 2022, 8:52 PM IST

Saptashringi Mata

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेला सप्तशृंगी मातेच्या (Saptashringi Mata) मुर्तीवरील शेंदुर नुकताच काढण्यात आला त्यामुळे देवीची मुळ मुर्ती आकर्षक दिसत आहे. या मूर्तीवर (on the idol of Saptashringi Mata) संवर्धनानंतर अभिषेक न करण्याचा निर्णय (Abhishekam will no longer be performed) मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

नाशिक: महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेला सप्तशृंगी मातेच्या (Saptashringi Mata) मूर्तीवर संवर्धनानंतर अभिषेक न करण्याचा निर्णय (Abhishekam will no longer be performed) मंदिर प्रशासनाने घेतलाय, त्यासाठी आता पर्याय व्यवस्था म्हणून 25 किलो देवीची चांदी धातूची मूर्ती तयार करण्यात आली असून, त्यावर अभिषेक केला जाणार असल्याच महापूजा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. वणीच्या सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून 1100 किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर आता दररोज होणारा पंचामृत अभिषेक श्री भगवती मूर्तीवर होणार नाही.

अभिशेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार भाविकांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या देवीच्या 25 किलो चांदीच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे. श्री भगवतीच्या मूळ स्वरूपाला पुन्हा इजा होऊ नये, किंवा त्यात बदल होऊ नये तसेच वर्षानुवर्ष भाविकांना भगवतीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.


श्री भगवतीच्या मूर्तीवर दररोज पाणी,दूध, लोणी,साखर,मध, नारळ पाणी आणि तुपाचा पंचामृत अभिषेक केला जातो, मात्र आता पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार भाविकांच्या योगदानातून साकारण्यात आलेल्या 25 किलो देवीच्या चांदीच्या मूर्तीवर पंचामृत,महापूजा करण्यात येणार आहे धार्मिक मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे, तसेच 26 सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून सप्तशृंगी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले होणार असून श्री भगवतीच्या मूळ रूपाचे दर्शन आता भाविकांना लवकरच होणार आहे.

Last Updated :Sep 23, 2022, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.