Navratri 2022: येवला शहरातील देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात; मूर्तींच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ

author img

By

Published : Sep 23, 2022, 10:02 AM IST

40 To 45 Percent Increase

नवरात्र उत्सव ( Navratri Festival 2022 ) काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरिता देवीच्या मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. यावर्षी 40 ते 45 टक्के मूर्तीच्या किमतीत वाढ झाली ( 40 To 45 Percent Increase) आहे. तसेच येवला शहरातील कारागीर देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे दिसून येत असले तरी पावसामुळे मुर्त्यांना कलर देण्यात कारागिऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.

नाशिक - अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी ( Navratri Festival 2022 ) होते. यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत. नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरता देवीच्या मुर्त्या बनवण्यात कारागीर व्यस्त असून, यावर्षी 40 ते 45 टक्के मूर्तीच्या किमतीत वाढ ( 40 To 45 Percent Increase ) झाली आहे. तर सतत पडत असलेल्या पावसामुळे मुर्त्यांना कलर देण्यात कारागिऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग महागल्यामुळे यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

येवला शहरातील देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात; मूर्तींच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ



पावसामुळे मुर्त्या वाळण्यास विलंब - येवला शहरातील कारागीर देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे दिसून येत असले तरी देखील सतत पडणाऱ्या पावसामुळे ओलावा निर्माण झाल्याने मूर्त्या अजून ओल्या असल्या कारणाने मूर्ती वरील कलर सुकण्यास वेळ लागत आहे. यामुळे मूर्तीकाराना कलर देण्यास अडचणी निर्माण होत असून यावर्षी देवीच्या मूर्तींच्या किमती 40 ते 45% वाढ झाली असल्याची माहिती मूर्ति कारागिरांनी दिली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नक्कीच या देवीच्या मूर्ती ओल्या राहत असल्याने कारागिरांना याचा फटका बसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.