नाशिक शहरात तब्बल २ लाख ८७ हजार दुबार मतदार, मतदार यादी घोटाळ्यात मोठे रॅकेट

author img

By

Published : Sep 14, 2021, 5:02 PM IST

Updated : Sep 14, 2021, 5:26 PM IST

नाशिक शहरात तब्बल २ लाख ८७ हजार दुबार मतदार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेने केला आहे. सेनेच्या या दाव्याने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या शुद्धीकरण मोहिमेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिक - नाशिक शहरात तब्बल २ लाख ८७ हजार दुबार मतदार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेने केला आहे. सेनेच्या या दाव्याने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या शुद्धीकरण मोहिमेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. एकट्या नाशिकमध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार नावे नोंदवली असेल तर राज्यात किती असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, याचा अंदाज येतो.

2 लाख ८७ हजार दुबार नावे वगळावे, शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार -

जिल्ह्याची प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये विधानसभेच्या नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व मतदार संघ व इतर मतदारसंघातील एकूण २ लाख ८७ हजार ४९३ दुबार मतदार असल्याचा आरोप करत ही नावे मतदार याद्यांमधून वगळावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक शहरात तब्बल २ लाख ८७ हजार दुबार मतदार
सर्वाधिक दुबार मतदार नाशिक पश्चिममध्ये १ लाख २२ हजार २४२ इतके असून नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य मतदार संघात ही संख्या अनुक्रमे ८८ हजार ९३२ आणि ७६ हजार ३१९ इतकी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप,जिल्हाप्रमुख विजय करंजकर,महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आ.वसंत गिते,माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, आदी उपस्थित होते. यावेळी दुबार नावांची पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या शिष्टमंडळास दिले आहे.
हे ही वाचा - लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने छापल्या बनावट नोटा; सुरगाणा तालुक्यातील धक्कादायक प्रकार


दुबार नावे पुढीलप्रमाणे -

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेली जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील दुबार मतदारांची संख्या मतदार संघनिहाय पुढील प्रमाणे. नांदगाव (१२११७) मालेगाव (४५०७), मालेगाव बाह्य (११७१६), सिन्नर (८३९८), बागलाण (१२३५४), निफाड (९८८३), दिंडोरी (८६२४), नाशिक पूर्व(१२३५७),नाशिक मध्य (१२३४७) तर इगतपुरी (५३५३).


नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात असलेली जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदार संघनिहाय पुढीलप्रमाणे नांदगाव (७८८६), मालेगाव मध्य (६५५), मालेगाव बाह्य (८२१३), बागलाण (७१९५), सिन्नर (६७७६), निफाड (९१९५), दिंडोरी (८४८३),नाशिक पूर्व (८५९९), नाशिक मध्य (८९७०), नाशिक पश्चिम (१०२५१), देवळाली (८४७८) तर इगतपुरी (४०३१).


नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात असलेले जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदारसंघनिहाय पुढील प्रमाणे नांदगाव (६५७३), मालेगाव मध्य (२२३२),मालेगाव बाह्य (६६७४), बागलाण (५१२८), सिन्नर (४५३०), दिंडोरी (४७५१), नाशिक पूर्व (९१२२), नाशिक मध्य (१२२४२), नाशिक पश्चिम (१०७२४), देवळाली (५०५८) आणि इगतपुरी (२९४३). बडगुजर यांनी तब्बल तीन महिने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांची छाननी करत हा घोळ समोर आणला.

हे ही वाचा - बेछूट व बिनबुडाचे आरोप करण्याचा किरीट सोमैयांना उद्योग - नवाब मलिक


आगामी नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरात तब्बल २ लाख ८७ हजार दुबार मतदारांची नोंद झाल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेने केला आहे. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तब्बल तीन महिने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांची छाननी करत हा घोळ समोर आणला आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेत ढीगभर दुबार मतदार नोंदणीचे पुरावे सादर केले आहे. तर जिल्हा प्रशासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


शिवसेनेने या प्रकरणी पोलिसांत देखील धाव घेतलीय पोलीस आयुक्तांनाही या प्रकरणी निवेदन देण्यात आले आहे. तर निवडणूक आयोगाच्या सचिवांनी देखील भेटीची वेळ दिली असून त्यांनाही या प्रकरणाचे पुरावे सादर करणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले आहे.
नाशिक

Last Updated :Sep 14, 2021, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.