International Nurses Day 2022 : 'माझ्या सहकारी परिचारिकांनी सामूहिक प्रार्थना केली अन्...'; परिसेविकेने सांगितला कोरानाकाळातील प्रसंग

author img

By

Published : May 12, 2022, 4:42 PM IST

shalini masarkolhe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रकृती ( Corona Second Wave ) गंभीर होऊन सुद्धा मृत्यूवर मात केल्याने आज जिंवत आहे, अशी भावना परिसेविका शालिनी मरसकोल्हे ( Nurse Shalini Mararskolhe ) यांनी व्यक्त केली जागतिक परिचारिका दिनानिमित्त ( International Nurses Day 2022 ) व्यक्त केली आहे.

नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ( Corona Second Wave ) भयाण रुप धारण केले असताना 12 मे 2021 डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी करत माझ्या सहकारी परिचारिकांनी सामूहिक प्रार्थना केली. त्यावेळी प्रकृती गंभीर होऊन मृत्यूवर मात केल्याने आज जिवंत आहे. त्याला आज वर्षपूर्ती होत आहे. याच श्रेय कोणाला असेल, तर माझ्या सर्व सहकारी परिचारिकांना आहे, अशी भावना जागतिक परिचारिका दिनानिमित्त ( International Nurses Day 2022 )विभागीय परिसेविका शालिनी मरसकोल्हे ( Nurse Shalini Mararskolhe ) यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. शालिनी मरसकोल्हे या नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात कार्यरत आहेत. जागतिक परिचारिका दिनामित्त त्यांनी कोरोनाकाळात ओढावलेला हा प्रसंग व्यक्त केला आहे.

शालिनी मरसकोल्हे म्हणाल्या की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत भीती होती. मात्र, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी रुग्णालयात जागा भेटणे कठीण होऊन बसले होते. याच काळात एका मागून एक परिचारिका कर्मचारी कोरोना बाधित होत गेला. मलाही 4 मे रोजी कोरोनाची लागण झाली. घरात म्हातारे आई वडील, आणि मुलगा. प्रकृती गंभीर होत चालली असतांना ऑक्सिजन लेव्हल खाली हे सगळे मॉनिटरवर दिसत होते. पण, सहकाऱ्यांनी समोर आल्यावर जाणवू दिले नाही. मात्र, पाठीमागे जाऊन रडत राहिल्या.

शालिनी मरसकोल्हे यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

विभागीय परिसेविका निर्मला सोमकुवर सांगतात, आम्ही त्या काळात शेकडो रुग्णांची सेवा केली. परंतु, आमच्या सहकारी हिची प्रकृती बिघडत असताना औषध मिळत नव्हते. प्रकृती खालावत होती. इंजेक्शनसाठी आमची पायपीट सुरू होती. घरात एकटी महिला असल्याने उपचाराचा खर्च कोण करणार, असा प्रश्न आला. तेव्हा प्रत्येकाने तयारी केली. पण, तिची सहकारी परिचारिका अलका मेश्राम हिने पाच लाख खात्यात जमा केले. काहीही झाले तरी जीव वाचला पाहिजे, यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न डॉक्टरांनी केलेत. जीव वाचवण्यासाठी आकांततांडव सुरू राहिला. 11 मे ला प्रकृती गंभीर झाली. शेवटी डॉक्टरांनी प्रार्थना करा, असे सांगितले. शेवटी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 12 मे जागतिक परिचारिका दिनाच्या दिवशी सर्वांनी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी एकत्र येत प्रार्थना केली.

'स्वकीय दुरावले तिथे सरकाऱ्यांनी...' - शालिनी मरसकोल्हे म्हणाल्या की, तो दिवस आणि आजचा दिवस कायम स्मरणात आहे. त्यावेळी काय घडत होते हे कोणीच जाणवू दिले नाही. पण, प्रकृती बरी झाल्यानंतर सगळं कळत गेले. कोरोनात जिथे आप्त, स्वकीय दुरावले तिते मला सहकाऱ्यांनी जीवापाड काळजी घेतली. त्यामुळे आज जिवंत आहे, अशी भावना मरसकोल्हे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - Sharad Pawar : भाजपने केलेल्या टिकेला शरद पवारांचे प्रत्त्युत्तर; म्हणाले, 'या कवितेत कष्टकऱ्यांच्या...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.