Facebook Friend Raped Married Woman : 'फेसबुक फ्रेंड'चा विवाहित महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

author img

By

Published : May 12, 2022, 9:08 AM IST

Facebook Friend Raped Married Woman

फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून विवाहित महिलेला नोकरीचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना नागपूर शहरात उघडकीस आली ( Facebook friend raped married woman ) आहे. याप्रकरणी पीडित महिलेने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात ( Gittikhadan Police Station Nagpur ) दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपीला अटक करण्यात आली ( Accused Arrested In Rape Case ) आहे.

नागपूर : नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात ( Gittikhadan Police Station Nagpur ) एका 28 वर्षीय वैवाहिक महिलेने तिच्यावर फेसबुक फ्रेंडने अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली ( Facebook friend raped married woman ) आहे. नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून आरोपीने बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आधारे पोलिसांनी रजत मेघराज राणा नामक आरोपीला अटक केली ( Accused Arrested In Rape Case ) आहे.

या प्रकरणातील फिर्यादी महिला नवऱ्यासोबत पटत नसल्याने माहेरी राहण्यास आली होती. नवऱ्यापासून विभक्त राहू लागल्याने तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. म्ह्णून ती कामाच्या शोधात होती. त्याच दरम्यान फिर्यादी महिलेची ओळख फेसबुकवर रजत राणा (29) नामक इसमाशी झाली. राणाने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेशी ओळख वाढवली. मी सीए अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. माझ्या नागपूर शहरातील अनेक उद्योग समूहात ओळख्या आहेत. तुला चांगलं काम मिळवून देईल, अशा थापादेखील तो मारत असल्याने त्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला.

दरम्यानच्या काळात दोघांच्या बाहेर भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. राणा फेसबुक फ्रेंडवरून जवळचा मित्र झाल्याने त्या महिलेने तिच्या वैवाहिक जीवनाची माहिती राणाला दिली. राणाने त्या महिलेला धीर देत जवळीक साधली. या दरम्यान आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. मात्र, हळूहळू त्याच्या अत्याचाराचे प्रमाण वाढतं असल्याने ती महिला त्याला टाळू लागली होती. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने तिला शिवीगाळ करू लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर त्या महिलेने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी : फिर्यादी महिलेला स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येताचं तिने आरोपी राणाला टाळणे सुरू केले होते. मात्र, त्यामुळे आरोपी आणखी चिडला होता. त्याने फिर्यादी महिलेला तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार केल्याची नोंद महिलेने तक्रारीत केली आहे.


अल्पवयीन मुलीवर अत्याचार : शहरातील जरीपटका पोलीस ठाण्यात सुद्धा वेगळा बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये एका 27 वर्षीय तरुणाने 15 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सलग दोन वर्षे अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमितेश आशिष श्रीवास असे आरोपीचे नाव आहे. त्याने 15 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. गेल्या काही दिवसांपासून तो पीडित तरुणीला टाळत होता. त्याचा जाब विचारला असता तो जीवे मारण्याची धमकी देत असल्याने अखेर पीडित अल्पवयीन तरुणीने आरोपी अमितेश विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : दोन बायका फजिती ऐका.. नवरा २ बायकांसोबत राहणार ३-३ दिवस, रविवारी आईवडिलांसोबत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.