वारंवार पाकिस्तानकडे बोट दाखवू नका, पंडितांसाठी तुम्हा काय करताय? राहुल भट्ट हत्येवर राऊतांचा सवाल

author img

By

Published : May 13, 2022, 12:00 PM IST

संजय राऊत

कलम 370 काढल्यावर सुद्धा काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित सुरक्षित नाही, तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला. काश्मीर पंडित यांची हत्या करण्यात आली हे फार दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई - जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या (Rahul Bhat Murder) अधिकाऱ्याला ठार केले. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानवर बोट दाखवू नका - काश्मीर पंडित यांची हत्या ( Kashmiri Pandit in Kashmir ) करण्यात आली हे फार दुर्दैवी आहे. काश्मीरमध्ये हे पुन्हा सुरू झालेले आहे. याच्यामागे काय षडयंत्र आहे? हे तपासले पाहिजे. वारंवार काश्मीर आणि पाकिस्तानवर बोट दाखवू नका. आम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय करतोय? हा महत्त्वाचा विषय आहे. असे सांगत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ठणकावले आहे. कलम 370 काढल्यावर सुद्धा काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित सुरक्षित नाही, तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

गृहमंत्री व पंतप्रधानांनी विचार करावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकांचे राजकारण बाजूला सारून यावर लक्ष द्यायला पाहिजे. काश्मिरी पंडितांची घरवापसी, त्यांना सर्व सोयी सुविधा, त्यांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. तिथे सामान्य जनतेचे जीवन सुद्धा असुरक्षित आहे, हे वारंवार सांगितले जात आहे. तसेच हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर या विषयाने कश्मीरी पंडितांना न्याय भेटणार नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

हेही वाचा - Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेब करब भेट; वाचा संजय राऊतांसह कोण काय म्हणाले...

त्याच कबरीमध्ये जावं लागेल? - संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्या कालच्या भाषणाचा समाचार घेताना त्यांच्यावरही आगापाखड केली आहे. याबाबत ते म्हणाले की, वारंवार संभाजीनगरला यायचं, औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला डीवचण्यासाठी गुडघे टेकायचे. यावरून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असे ओवैसी बंधूंचे राजकारण दिसत आहे. ज्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. तुम्ही त्या कबरीवर येऊन नमस्कार करता, तुम्हाला एक दिवस त्याच कबरीमध्ये जावं लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांना दिला आहे.

नेत्यांनी तोलून मापून बोलावे! - महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी तोलून मापून बोलायला पाहिजे. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काम कोणी करू नये. महाविकास आघाडीसाठी शरद पवार सक्षम आहेत, असे सांगत संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. पटोले यांनी "राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला", असे वक्तव्य केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.