'वचन देतो, मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही' - राहुल पाटील

author img

By

Published : Jun 28, 2022, 10:35 AM IST

Rahul Patil

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. दिवसागणिक एक- एक आमदार गुवाहाटीत जाऊन शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेकडील आमदारांवर संशयाच्या नजरा आहेत. परभणीचे आमदार राहुल पाटील ( Parbhani MLA Rahul Patil ) गुवाहाटीला गेल्याच्या चर्चा रंगली. अफवांवर विश्वास ठेवू नका, मी मतदार संघात आहे. तसेच मरेपर्यंत शिवसेना ( Shiv Sena ) सोडणार नाही, असे सांगत दिवसभराच्या चर्चेला आमदार राहुल पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. दिवसागणिक एक- एक आमदार गुवाहाटीत जाऊन शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेकडील आमदारांवर संशयाच्या नजरा आहेत. परभणीचे आमदार राहुल पाटील ( Parbhani MLA Rahul Patil ) गुवाहाटीला गेल्याच्या चर्चा रंगली. अफवांवर विश्वास ठेवू नका, मी मतदार संघात आहे. तसेच मरेपर्यंत शिवसेना ( Shiv Sena ) सोडणार नाही, असे सांगत दिवसभराच्या चर्चेला आमदार राहुल पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल 51 आमदारांना घेऊन शिंदे यांनी बंड केला आहे. शिवसेनेतील तयार 39 आमदारांचा समावेश आहे. शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 13 आमदार होते. पण रोज एक- दोन आमदार जाऊन शिंदे यांना मिळत असल्याने त्यांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जोर- बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे कोणता आमदार कधी शिंदे गटात जाईल, याचा भरवसा राहिला नाही. प्रत्येक आमदारावर संशयाच्या फेऱ्यात आहे. साधा फोन लागला नाही, तरी शिंदे गटाच्या नावाने बोंबाबोंब सुरु होते.

आमदार राहुल पाटीलांबाबत आवई - परभणीचे आमदार राहुल पाटील यांचा फोन लागला नाही. त्यामुळे तेही शिंदे गटाला जात असल्याची चर्चा सुरू झाली. आमदार पाटील यांना ही माहिती कळताच, एका व्हिडीओद्वारे आपण मरेपर्यंत शिवसेनेत राहणार, असा खुलासा केला आहे.

काय म्हणाले राहुल पाटील - माझ्याबाबत अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मी माझ्या मतदारसंघातील परभणीतील दैनंदिन कामकाज संपवून मंत्रालयात उभा आहे. मंत्रालयातूनच बाहेर निघत आहे. मी कुठेही जाणार नाही. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. अशा प्रकारच्या बातम्यांवर परभणीतील माझ्या विधानसभेतील सर्व मतदारांनी विश्वास ठेवू नये. कुणीही अस्वस्थ होण्याचे कारण नाही. 'मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही', हे मी तुम्हाला आज वचन देतो, असे आमदार राहुल पाटील सांगत दिवसभर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा- Maharashtra Political Crisis : 29 जूनला भाजप आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना, सत्तास्थापनेच्या हालचाली?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.