Chandiwal Commission update : अनिल देशमुख यांच्या पीएसने चांदीवाल आयोगात दिली 'ही' महत्त्वाची माहिती

author img

By

Published : Jan 10, 2022, 10:06 PM IST

सचिन वाझे अनिल देशमुख

100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून चांदीवाल आयोगाची स्थापना ( Chandiwal commission probe about Anil Deshmukh ) करण्यात आली आहे. या आयोगासमोर पीएस संजीव पालांडे यांची उलटतपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी सचिन वाझे यांच्या वकिलाकडून ( Sachin Wazes advocate ) आज आयोगासमोर करण्यात आली. त्यावेळी संजीव पालांडे ( Sanjeev Palande in Chandiwal commission ) यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

मुंबई-निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेसोबत 100 कोटी रुपये वसुलीबाबत ( 100 crore extortion case ) कोणतीही चर्चा झाली नाही. मी कधीही त्याला अनिल देशमुख यांच्यावतीने पैसे गोळा करायला सांगितले नव्हती, अशी माहिती अनिल देशमुख यांचे खासगी सचिव ( Anil Deshmukhs PS in Chandiwal commission ) संजीव पालांडे यांनी आज सोमवार (दि.10) रोजी झालेल्या चांदीवाल आयोगासमोर माहिती दिली आहे.

100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून चांदीवाल आयोगाची स्थापना ( Chandiwal commission probe about Anil Deshmukh ) करण्यात आली आहे. या आयोगासमोर पीएस संजीव पालांडे यांची उलटतपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी सचिन वाझे यांच्या वकिलाकडून आज आयोगासमोर करण्यात आली. त्यावेळी संजीव पालांडे ( Sanjeev Palande in Chandiwal commission ) यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा-Anil Deshmukh : देशमुखांच्या मालमत्ता जप्ती याचिकेवर 19 जानेवारीपर्यंत कारवाई करु नये - मुंबई उच्च न्यायालय

काय म्हणाले संजीव पालांडे?
आपण अनिल देशमुख यांचे पीएस म्हणून तात्काळ 7 जानेवारी 2020 रोजी रुजू झालो होतो. फेब्रुवारी 2021 मध्ये गृहमंत्री आजारी पडले होते. या काळात पैसे घेण्याबाबत किंवा देण्याबाबत काही बोलणे झाले नाही. कोणत्याही प्रकारे पैसे घेण्याबाबत त्यांनी आदेश दिले नव्हते, असे आयोगाला उलटतपासणीत सांगितले आहे. आयोगाचे कामकाज उलट तपासणीनंतर संपले आहे. त्यानंतर आयोगाचे कामकाज 12 जानेवारीपर्यंत दुपारी 11.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेले आहे.

हेही वाचा-Riyaz Bhati petition in HC : रियाज भाटी याची अनिल देशमुख, पोलीस महासंचालकावर आरोप करणारी उच्च न्यायालयात याचिका दाखल

मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाई विरोधात देशमुख कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव-

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटूंबियांनी ईडीच्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे. ईडीने 19 जानेवारीपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवारी) झालेल्या सुनावणी दरम्यान दिला आहे. अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनीही ईडीकडून मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.