Sanjay Raut suggestive warning : 'ज्या दिवशी हे सर्व बंडखोर मुंबईत येतील त्यावेळी यांची खरी कसोटी' संजय राऊत यांचा सूचक इशारा
Updated on: Jun 24, 2022, 1:35 PM IST

Sanjay Raut suggestive warning : 'ज्या दिवशी हे सर्व बंडखोर मुंबईत येतील त्यावेळी यांची खरी कसोटी' संजय राऊत यांचा सूचक इशारा
Updated on: Jun 24, 2022, 1:35 PM IST
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष ( Maharastra Political Crisess ) आता शिगेला पोहोचला आहे. या संघर्षात नेमकी कुणाची हार होते आणि कुणाचा विजय होतो हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. याबाबत राऊत म्हणाले की, "ज्या दिवशी हे सर्व बंडखोर मुंबईतील त्यावेळी यांची खरी कसोटी आहे. तेव्हा त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्यावेळी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा महाविकास आघाडीकडे अगदी पूर्णपणे बहुमत असेल. या सर्व आमदारांचा महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असेल." असा विश्वास खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या संघर्षात नेमकी कुणाची हार होते आणि कुणाचा विजय होतो हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. पण, सध्या उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) व त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना चिंता आहे, ती आणखी किती जण आपल्याला सोडून जातात याची. गुरुवारी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि वाद निर्माण झाला. ही पोस्ट म्हणजे शरद पवार यांना सरळ सरळ धमकी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या सर्वांवर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
बहुमत खूप चंचल असतं : "एक लक्षात घ्या ही आता कायदेशीर लढाई आहे. त्यासाठी काही नियम आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णयदेखील आहेत. त्यामुळे आता पाहू पुढे काय होते ते. आमच्यातलेच काही लोक तिकडे गेलेत काही जण म्हणतात ते 40 आहेत काही जण म्हणतात ते 140 पण एक लक्षात घ्या महाविकासआघाडी आजदेखील एकसंध आहे ही बाब खरी आहे की आमची संख्या काहीप्रमाणात कमी झालेय. लोकशाही आणि बहुमत हे आकड्यांवर चालतं पण मी एक गोष्ट स्पष्टच सांगतो हा आकडा आणि बहुमत खूप चंचल असतं."
त्यांची खरी कसोटी : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "ज्या दिवशी हे सर्व बंडखोर मुंबईतील त्यावेळी यांची खरी कसोटी आहे. तेव्हा त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्यावेळी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा महाविकास आघाडीकडे अगदी पूर्णपणे बहुमत असेल. या सर्व आमदारांचा महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असेल." असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मोदी शहांनी विचार करावा : "आता काही लोक धमक्या देत आहेत. या लोकांचा माज शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत वाढला आहे. याच लोकांनी याआधी आम्हाला अगदी बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील शिवसेनेला धमक्या दिल्या आहेत. ठीक आहे त्यांना देऊ देत ती त्यांची संस्कृती आहे. पण, हीच भाजपची सुद्धा संस्कृती आहे का ? असा प्रश्न आज मी उपस्थित केलेला आहे. जर शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देणारा या महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना करावा लागेल."
...तर आपण नालायक आहोत : "या देशात लोकशाही आहे. या देशात स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारख्या नेत्याचा आदर पंतप्रधान मोदी करतात अगदी जगभरात त्यांचा आदर केला जातो. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. अशा व्यक्तीला फक्त चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे म्हणून धमक्या देणे हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला धमक्या द्या ठीक आहे. आम्ही समर्थ आहोत. पण शरद पवारांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या तपस्येचा तुम्हाला जर आदर करता येत नसेल तर मला असं वाटतं आपण मराठी म्हणून घ्यायला नालायक आहोत."
त्यांना निश्चितच पश्चाताप होईल : गुरुवारी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यात ते म्हणताहेत 'महाशक्ती आपल्या सोबत आहे. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला ते आपल्याला काही कमी पडू देणार नाहीत.' असं या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. यावर देखील राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, "लक्षात घ्या कोणत्या महाशक्तीत सामील व्हायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण, शिवसेना हा एक महासागर आहे. हा महासागर कायमच उसळलेला असतो. महासागर कधीच वाटत नाही. लाटा येतात लाटा जातात पण जे गेलेत त्यांना निश्चितच पश्चाताप होईल." असा इशारा संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : पवारांना धमकी ही भाजपची भूमिका आहे का ? राऊतांचा मोदी, शहांना थेट सवाल
