Riyaz Bhati petition in HC : रियाज भाटी याची अनिल देशमुख, पोलीस महासंचालकावर आरोप करणारी उच्च न्यायालयात याचिका दाखल

author img

By

Published : Jan 10, 2022, 7:35 PM IST

Riyaz Bhati petition in HC

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे ( Director General of Police Sanjay Pandey ) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज सोमवार (दि. 10) रोजी रियाज भाटी यानी याचिका ( Riyaz Bhati petition in HC ) दाखल केली. या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या बैठका होत होत्या. माझ्यावर दबाव आणून ठाण्यात मला परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष द्यायला सांगितली होती. असा आरोप रियाज भाटी यांनी ( Riyaz Bhati allegations on Anil Deshmukh ) याचिकेत केला आहे.

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे ( Director General of Police Sanjay Pandey ) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज सोमवार (दि. 10) रोजी रियाज भाटी यानी याचिका ( Riyaz Bhati petition in HC ) दाखल केली. या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या बैठका होत होत्या. माझ्यावर दबाव आणून ठाण्यात मला परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष द्यायला सांगितली होती. असा आरोप रियाज भाटी यांनी ( Riyaz Bhati allegations on Anil Deshmukh ) याचिकेत केला आहे.

...म्हणून मुंबईत माझ्यावर गुन्हा दाखल केला -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर बैठका होत होत्या. अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर पहिली बैठक 31 मार्च 2021 या दिवशी झाली होती. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल केली नाही म्हणून मुंबईत माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला असे भाटीचा आरोप आहे.

74 पानांची याचिका -

या बैठकांमध्ये राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे देखील सहभागी होत असल्याचा आरोप रियाज भाटी यांनी याचिकेमध्ये केला असून 74 पानांची याचिका आहे. याच सोबत काही ॲाडिओ रेकाॅर्डिंग रियाज भाटीने याचिके सोबत पुरावा म्हणून सादर केल्या आहे. येणाऱ्या दोन दिवसात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Santosh Bangar on Viral Letter : जवळच्या कार्यकर्त्याकडून पत्राचा चुकीचा वापर; आमदार संतोष बांगर यांचा व्हायरल पत्रावर खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.