Uddhav Thackeray : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्त्युत्तर.. म्हणाले, तुमच्या राजकारणात..

author img

By

Published : May 15, 2022, 10:53 AM IST

Rambhau Mhalgi Prabodhini Replied CM Thackeray

शिवसेनेच्या मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीवर जोरदार हल्लाबोल केला ( Uddhav Thackeray Criticized Rambhau Mhalgi Prabodhini ) होता. त्यावर आता प्रबोधिनीने प्रत्त्युत्तर दिले ( Rambhau Mhalgi Prabodhini Replied CM Thackeray ) आहे. प्रबोधिनीसारख्या नावाजलेल्या ज्ञानकेंद्राला पक्षीय राजकारणात ओढू नका, असे प्रबोधिनीने ट्विटद्वारे म्हटले ( Rambhau Mhalgi Prabodhini Tweet ) आहे.

मुंबई - बीकेसी येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीवर जोरदार हल्लाबोल ( Uddhav Thackeray Criticized Rambhau Mhalgi Prabodhini ) केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून प्रत्युत्तर देण्यात ( Rambhau Mhalgi Prabodhini Replied CM Thackeray ) आले. प्रबोधनी सारख्या नावाजलेल्या ज्ञान केंद्राला पक्षीय राजकारणात ओढू नका, असे आवाहन रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीकडून ट्विटरद्वारे करण्यात आले ( Rambhau Mhalgi Prabodhini Tweet ) आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षीय राजकारणात ओढून-ताणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी सारख्या ज्ञानकेंद्राला खेचू नये. प्रबोधनी ही संयुक्त राष्ट्र संघानेही सल्लागार संस्था म्हणून नावाजलेली एक प्रशिक्षण व संशोधन संस्था आहे. इथे होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शिवसेनेसह सर्व प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लाभ घेतला आहे, असे स्पष्टीकरण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून करण्यात आले आहे. तसेच प्रमोद महाजन यांच्यानंतर आता लोकतांत्रिक प्रक्रियेतून निवडलेले देवेंद्र फडणवीस हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर विनय सहस्त्रबुद्धे आजही उपाध्यक्ष आहेत. संस्थेचे काम पूर्वीसारखे सुरळीत व नव्या काळानुरूप आणखी गतिशील सुरू असल्याचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे म्हणणे आहे.

Rambhau Mhalgi Prabodhini Tweet
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ट्विट
Rambhau Mhalgi Prabodhini Tweet
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ट्विट


काय म्हणाले होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे : मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे. तिथे त्यांचे चिंतन आणि कुंथन चालते. मी तिकडे गेलो होतो. प्रमोद महाजन असताना. उत्तम साहित्य, उत्तम मार्गदर्शन करायचे. प्रमोद महाजन यांना विचारलं इथे नेमकं, काय चालत? ते म्हणाले, प्रशिक्षण देतो, कार्यकर्ता घडवतो. कार्यकर्ता कसा असावा, राजकारणी कसा असावा, याचा अनुभव देतो. आता प्रश्न पडतो, प्रबोधिनीमध्ये हे तिकडे शिकवलं का? हे तुमचे प्रोडक्ट आहे? ही तुमची पिढी आहे का? जे इथे होते ते कुठेच दिसत नाहीत? आता जबाबदारी कोणावर आहे? सहस्रबुद्धे देखील दिल्लीत गेले. त्यामुळे आता कुणाकडे जबाबदारी आहे, असा सवाल उपस्थित केला. तसेच खोटंनाट आपण बोलत नाही. खोटं बोलणंच आपल्याला जमत नाही आणि त्यांच्यात खोटं बोलल्याशिवाय हिंदुत्त्व पूर्ण होत नाही, अशी जोरदार फटकेबाजी केली.

हेही वाचा : तुमच्या वजनाने बाबरी मशीद पडली असती, मुख्यमंत्र्यांची फडणवीसांवर खोचक टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.