Rajya Sabha Election 2022 : राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक, कोणाला मिळणार पुन्हा संधी, वाचा सविस्तर
Updated on: May 12, 2022, 6:36 PM IST

Rajya Sabha Election 2022 : राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक, कोणाला मिळणार पुन्हा संधी, वाचा सविस्तर
Updated on: May 12, 2022, 6:36 PM IST
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेतील 57 खासदारांचा कार्यकाल नुकताच संपला आहेत. या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेवरील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत राज्यसभेच्या सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असो 10 जून रोजी यासाठी मतदान होईल.
Rajya Sabha Election 2022 : मुंबई - राज्यसभेतील 57 खासदारांचा कार्यकाल नुकताच संपला आहेत. या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेवरील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत राज्यसभेच्या सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे, तर 10 जून रोजी यासाठी मतदान होईल.
या खासदारांचा संपला कार्यकाळ - शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, काँग्रेसकडून पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल आणि विकास महात्मे या तीन राज्यसभेवरील खासदारांचे मुदत संपत आहे. त्यामुळे 'या' सहा जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
पुन्हा संधी मिळण्याची शक्यता - राज्यसभेसाठी 15 राज्यातून एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा कोणत्या खासदाराला संधी दिली जाते. याबाबतच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल तसेच भारतीय जनता पक्षाकडून पियुष गोयल यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
कोणाच्या किती जागा - जुलै महिन्यात राष्ट्रपती पदासाठी देखील निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला आकड्यांची गणित जुळवावी लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची समजली जातेय. महाराष्ट्रातून 19 खासदार राज्यसभेवर जात असतात. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 शिवसेनेचे 3 आणि काँग्रेसचे 3 तसेच रिपाई (आठवले गट) एक आणि एक अपक्ष खासदाराचा समावेश असतो.
संभाजी राजे अपक्ष लढणार - त्यातच नुकतेच खासदारकीची मुदत संपलेले छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अपक्ष खासदारांसाठी निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - BJP Tweet Poster On CM Shabha : मुख्यमंत्र्यांच्या १४ मेच्या सभेची भाजपकडून ट्विटरद्वारे खिल्ली
