Shivsena Hindutva : दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी, आता शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नका ; अंबादास दानवेंचा शिंदे सरकारला टोला

author img

By

Published : Sep 13, 2022, 10:20 AM IST

Opposition Leader Ambadas Danve

शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचे आणि ती फोडण्याचं पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केले, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व ( taunts CM Eknath Shinde over Shivsena Hindutva ) शिकवू नये, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना ( Ambadas Danve taunts CM Eknath Shinde ) खडसावले.

मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९३ साली दंगल झाली, तेव्हा शिवसेनेने मुंबई वाचवली. बाबरी मशीद पडली ,त्याची जबाबदारी देखील सेनेने उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचे आणि ती फोडण्याचं पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केले, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व ( taunts CM Eknath Shinde over Shivsena Hindutva ) शिकवू नये, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना ( Ambadas Danve taunts CM Eknath Shinde ) खडसावले. तसेच पैठण येथील मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या विधानांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.


मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याचा आरोप शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याचं पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते कबूल ( Ambadas Danve on Shivsena Hindutva ) केलं. ज्या पद्धतीने दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राचा अपमान करत आहात. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील, तर ते तुम्हाला लखलखाट होवो असा घणघणा दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर केला. मराठवाड्यात येऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरले. विकासाबाबत एक शब्दही काढला नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याचं काम करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.


सामनाने भल्याभल्यांची वाट लावली सामना वर्तमानपत्रातील अग्रलेख व बातमी यांची देशपातळीवर दखल घेतली जाते. सामनामध्ये आलेल्या बातमीने भल्याभल्यांची वाट लावली. यामुळे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावर टीका करताना संभाळून बोलण्याचा इशारा दानवे यांनी ( Opposition Leader Ambadas Danve ) दिला.


उपसा गव्हाण योजनेची चौकशीची मागणी पैठण येथील सभेत मंत्री संदीपान भुमरे यांनी घोषणा केलेल्या योजना या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंजुरी झाल्या होत्या. आता उपमा गव्हाण योजना घोषित केली, ती संकल्पना अप्पा निर्मळ यांची होती. एक प्रकारे भुमरे हे टाळूवरच लोणी खाण्याचं काम करत आहेत. हे कंत्राट त्यांच्या जावई यांना मिळाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी करत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.