Lakhimpur Kheri Violence : केंद्र आणि योगी सरकारचा विरोधकांकडून निषेध

author img

By

Published : Oct 5, 2021, 8:12 PM IST

विरोधकांकडून निषेध

भाजपा खासदारांच्या ताफ्याद्वारे चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत देशासह राज्यात देखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. आज दादर येथे डावे पक्ष शेतकरी आणि कामगार संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली.

मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खैरी येथील शेतकरी आंदोलनातील घटनेचे तीव्र पडसाद आज मुंबईसह राज्याच्या विविध भागात उमटले. मुंबईत दादर येथे देखील डावे पक्ष शेतकरी संघटना आम आदमी, समाजवादी पक्षातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार आणि योगी सरकारचा निषेध करण्यात आला.

सरकारचा विरोधकांकडून निषेध
सरकारचा विरोधकांकडून निषेध

राज्यभर पडसाद -

भाजपा खासदारांच्या ताफ्याद्वारे चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत देशासह राज्यात देखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. आज दादर येथे डावे पक्ष शेतकरी आणि कामगार संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. भाजपा सरकारच्या गुन्हेगारीविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी आणि देशभरातील शेतकऱ्यांशी एकता दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

सरकारचा विरोधकांकडून निषेध
सरकारचा विरोधकांकडून निषेध

विरोधक एकवटले -
लखीमपुरमध्ये शेतकरी आंदोलन करण्यासाठी एकत्र झाले होते. मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले होते. शांततेत आंदोलन करणार होते तेव्हा त्यांच्यावर प्रस्थापितांनी, भाजप सरकारमधील लोकांच्या कुटुंबीयांतील व्यक्तींनी शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना लांब करण्याचा प्रयत्न केला यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी भाजप सरकार आणि केंद्रात बसणाऱ्या लोकांची आणि युपीच्या सरकारची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आहेत. लवकरात लवकर या गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली पाहीजे त्याबरोबर हे कृषि काळे कायदे पाठी घेतले पाहिजे असे कॉ. शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले.

विरोधकांकडून निषेध
विरोधकांकडून निषेध

केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी -

जर ही घटना प्रमाण बनली तर नागरिकांच्या मतभेदांच्या अधिकाराचे संरक्षण करणे अशक्य होईल. पूर्वीपेक्षा आता सरकारमध्ये या गुंडगिरीविरोधात मोर्चा काढणे आवश्यक आहे, जेणेकरून ते काय आहे हे ओळखले जाईल. राजकीय सत्तेचा बेलगाम गैरवापर या विरोधात आपण आवाज उठवायलाच हवा. आम आदमी पक्षाने भाजप खासदार अजय कुमार मिश्रा यांच्या मुलासह इतर सर्वांना अटक करण्याची आणि तुरुंगवासाची मागणी केली आहे आणि खासदार अजय कुमार मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे." असं मत आप मुंबई कार्यकारी अध्यक्ष यांनी मांडले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.