Raid on PFI Offices : पीएफआयच्या राज्यातील अनेक ठिकाणांवर छापेमारी, काही जणांना घेतलं ताब्यात

author img

By

Published : Sep 27, 2022, 8:47 AM IST

Updated : Sep 27, 2022, 10:08 AM IST

raid

राज्यात रात्रीपासून पीएफआयच्या (NIA PFI Raids Aurangabad) अनेक ठिकाणावर तपास यंत्रणांकडून छापेमारी सुरू केली आहे. औरंगाबादमधून 13 तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून 7 तर सोलापुरातून 1 जण ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर ठिकाणीही छापेमारी सुरू आहे.

मुंबई - राज्यात रात्रीपासून पीएफआयच्या (NIA PFI Raids Aurangabad) अनेक ठिकाणावर तपास यंत्रणांकडून छापेमारी सुरू केली आहे. औरंगाबादमधून 13 तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून 7 तर सोलापुरातून 1 जण ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर ठिकाणीही छापेमारी सुरू आहे. मागील आठवड्यातही एनआयए, ईडी आणि एटीएसने देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी (NIA ED ATS Raid on PFI Offices in Maharashtra) करत अनेक जणांना अटक केली होती.

सोलापूर, औरंगाबादेत कारवाई - आज पहाटेच औरंगाबाद शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तेरा लोकांना अटक केली आहे. हे सगळे लोक पीएफआयशी संबंधित आहेत, ही सगळी मंडळी पीएफआयचे सदस्य आहेत, तर पीएफआयचे सचिव या दर्जाचेही लोक आहेत. त्या लोकांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर पोलिसांची नजर होती. एटीएसने जी चौकशी केली त्यातनं ही माहिती पुढे आली आणि त्यानंतर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शहरातून 13 तर मराठवाड्यातून इतर ठिकाणाहून 7 असे तब्बल 21 लोकांना अटक झाली आहे, पहाटे 3 वाजता हे ऑपरेशन सुरू झाले, या सगळ्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे, प्राथमिक माहितीनुसार ही प्रतिबंधतामक कारवाई असल्याचे समोर आले आहे.

आयबीसुद्धा करणार तपास - औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आलेले सगळे पीएफआयचे ॲक्टिव्ह सदस्य होते अशी माहिती पुढे आलेली आहे. यातील काही लोक जुडो कराटेचे प्रशिक्षण देत होते अशीही माहिती पुढे आलेली आहे. या 13 सदस्यांवर करडी नजर होती आणि त्यानुसार कोंबिंग ऑपरेशननंतर या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी शहरात आता आयबीची टीमसुद्धा दाखल झाली आहे. ती लोक सुद्धा या सगळ्यांची चौकशी करणार आहेत. त्यानंतर या सगळ्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

याआधी तीन जण घेतले होते ताब्यात - दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून देशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. ज्यात औरंगाबादच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर सुद्धा एटीएस आणि एनआयए च्या पथकाने कारवाई केली. कारवाईत पथकाने एकूण तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यात नॅशनल कॉलनीतुन सय्यद फ़ैसल,बायजीपुरा भागातून पॉप्युलर फ्रंटचा माजी जिल्हाध्यक्ष शेख़ इरफ़ान आणि परवेज़ खान याला बायजीपुरा येथून ताब्यात घेतले आहे. एटीएस आणि एनआयएच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास औरंगाबादच्या जिन्सी भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापा टाकला होता.

Last Updated :Sep 27, 2022, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.