Aryan Khan Drug Case : पेपर वर्कसाठी NCB टीम 'मन्नत'वर

author img

By

Published : Oct 21, 2021, 12:54 PM IST

Updated : Oct 21, 2021, 6:49 PM IST

Aryan Khan drugs case

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी तपास करण्यासाठी एनसीबीचे एक पथक मन्नत बंगल्यावर दाखल झाले आहे. काही पेपर वर्क करण्यासाठी आमची टीम मन्नतवर गेली होती, असे स्पष्टीकरण एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिले आहे.

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी तपास करण्यासाठी एनसीबीचे एक पथक शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र, काही मिनिटांच्या कारवाईनंतर एनसीबीचे पथक बाहेर पडले आहे. काही पेपर वर्क करण्यासाठी आमची टीम मन्नतवर गेली होती, असे स्पष्टीकरण एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिले आहे. तसेच ही रेड नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शाहरुख खानने सकाळी ऑर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यन खानची भेट घेतली होती.

  • Drugs on cruise ship matter | Mumbai: Special NDPS Court extends judicial custody of Aryan Khan and others till 30th October.

    — ANI (@ANI) October 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ -

आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे.

एनसीबीचे पथक मन्नत बंगल्यावर

ड्रग्ज प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 19 दिवसांपासून तरुंगात आहे. काल मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नाकारला. त्यामुळे जामीन मिळू शकला नाही. आज शाहरूख खान आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला. शाहरूखला तीन आठवड्यांनी आर्यनला भेटण्यासाठी केवळ दहा मिनिटाची परवानगी कारागृह प्रशासनाने दिली होती.

  • Mumbai | NCB team visited Shah Rukh Khan's residence to collect some documents related to Aryan Khan. No raids were conducted at 'Mannat: NCB Zonal Director Sameer Wankhede

    — ANI (@ANI) October 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन आठवड्यांनी दहा मिनिटांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानला लेकाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणं झालं. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसेच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव -

मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. विशेष एनडीपीएस सेशन्स कोर्टाच्या निकालाला आर्यनच्या वकीलांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. आर्यन खानच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

Last Updated :Oct 21, 2021, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.