'सामान्य माणूसही समजतो, की ही भाजपची खेळी आहे'- बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Jun 29, 2022, 12:19 PM IST

Balasaheb Thorat

राज्यपालांनी ( Governor ) तशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याकारणाने महाविकास आघाडी नेत्यांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. या संपूर्ण नाट्यमय घडामोडी मागे भाजपची खेळी असल्याचा आरोप काँग्रेस नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी केला आहे.

मुंबई - राज्यातील सत्तांतर नाट्याचा अंतिम अंक सुरू झाला असून ठाकरे सरकारला ( Thackeray government ) बहुमत चाचणीला उदया सामोरे जावे लागणार आहे. राज्यपालांनी ( Governor ) तशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याकारणाने महाविकास आघाडी नेत्यांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. या संपूर्ण नाट्यमय घडामोडी मागे भाजपची खेळी असल्याचा आरोप काँग्रेस नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी केला आहे.

काय म्हणालेत बाळासाहेब थोरात?

ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पत्र दिल आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, वास्तविक १६ आमदारांना अपात्र केल्याप्रकरणी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याचबरोबर उद्या बहुमत सिद्ध करायचं हे मला व्हाट्सअप द्वारे समजलं आहे. त्याबाबत अधिकृत पत्र माझ्याकडे आलेल नाही. परंतु, इतक्या कमी कालावधीमध्ये उद्याच्या उद्या गडचिरोली, भंडारा येथील आमचे काँग्रेसचे आमदार मुंबईत कसे येऊ शकतील हा सुद्धा प्रश्न आहे. इतक्या कमी अवधीत हे आमदार मुंबईत कसे पोहोचणार. याबाबत आम्ही सर्व नेते चर्चा करणार आहोत असे थोरात म्हणाले.

ही भाजपची खेळी?

राज्यात सध्या सुरू असलेल्या या संपूर्ण राजकीय नाट्यमय घडामोडी मागे भाजपच असल्याचे सांगत, ही भाजपची खेळी असल्याचं सामान्य माणूसही समजतो असेही ते म्हणाले. याबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, असून काही कायदेशीर बाबी आहेत. त्या तपासल्या जात आहेत. याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असेही थोरात यांनी यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - MVA Govt In SC : राज्यपालांच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात, 5 वाजता सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.