Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात ७१ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण

author img

By

Published : Sep 30, 2022, 4:54 PM IST

Updated : Sep 30, 2022, 9:51 PM IST

Bullet Train

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला (Bullet Train Project) आता वेग आला आहे. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनसाठी ७१ टक्के भूसंपादन पूर्ण झाले (७१ PERCENT LAND ACQUISITION FOR BULLET TRAIN IN THANE COMPLETED) आहे. या जागेचा ताबा नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनलाही (National High Speed Rail Corporation) देण्यात आला आहे. Mumbai Ahmedabad Bullet Train Project.

मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा रुळावर आला आहे. गुजरातच्या दिशेने बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईच्या दिशेने भूसंपादनाबाबत अडचण होती. ही समस्याही आता संपली आहे. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनसाठी ७१ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. भूसंपादन झालेल्या जागेचा ताबा नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनलाही देण्यात आला आहे. त्यासाठी काही गावांतील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. भूसंपादनाच्या कामाला आता वेग आला आहे.

त्यानंतर तातडीने कारवाई करून गुरुवारी जागेचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प गुजरातमधील अहमदाबाद ते महाराष्ट्राची राजधानी मुंबई दरम्यान असून, त्यावर काम वेगाने सुरू आहे. या अंतर्गत, भरुच (गुजरात) मध्ये पिलरचे काम दिसू लागले आहे, त्याची पहिली चाचणी 2026 मध्ये गुजरातमधील बिलीमोरा आणि सुरत दरम्यान केली जाईल, त्यानंतर इतर विभागांमध्ये चाचण्या केल्या जातील. लोकांना वाहतुकीची कोणतीही अडचण येऊ नये, अशा पद्धतीने हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.

सुरुवातीला ही ट्रेन सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार असून ती रात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे. गर्दीच्या वेळेत 20 मिनिटे आणि नॉन-पिक अवर्समध्ये अर्धा तास ट्रेन उपलब्ध असेल. त्यानंतर मागणीनुसार उपलब्द केली जाणार आहे. यासोबतच प्रवाशांना बुलेट ट्रेनमध्ये चढण्यासाठी कमी वेळ लागेल, जास्त जागा मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमानात चढताना उपलब्ध नसलेली कनेक्टिव्हिटी असेल. बुलेट ट्रेनची कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजेच हायस्पीड ट्रेनची रचना विमानाच्या कम्युनिकेशन सिस्टीमप्रमाणे करण्यात आली आहे. यात प्रवाशांसाठी आपत्कालीन बटण असेल. प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास प्रवाशांना त्यांची समस्या बुलेट ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना कळवता येणार आहे.

कोच पूर्णपणे साउंड प्रूफ करण्यात आला आहे. डब्यात डबल स्किन मिश्र धातु, एअर टाइट फ्लोअर, ध्वनी शोषणारे साइड कव्हर इत्यादी पॅनेल्स बसवले जातील. यासह, सर्व कार कंपन कमी करण्यासाठी सक्रिय सस्पेंशन सिस्टमसह सुसज्ज असतील. आरामदायी सीट लक्षात घेऊन सर्व गाड्यांमध्ये रिक्लाईनिंग सीट्स असतील.रेल्वेमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार देशात बुलेट ट्रेनसाठी 7 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई अहमदाबाद तसेच दिल्ली नोएडा आग्रा लखनौ वाराणसी, 865 किमी आणि दिल्ली जयपूर उदयपूर अहमदाबाद, 886 किमी, मुंबई नाशिक नागपूर, 753 किमी, मुंबई पुणे हैदराबाद, यांचा समावेश आहे. 711 किमी , चेन्नई बेंगळुरू म्हैसूर, 435 किमी आणि दिल्ली चंदीगड लुधियाना जालंधर अमृतसर, 459 किमी चा समावेश असणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले : महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पालघर या तिन्ही भागातून बुलेट ट्रेनसाठी जमिनीच्या खालून आणि जमिनीच्या वरती असा मार्ग असल्यामुळे त्या ठिकाणच्या मार्गासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष जमिनीचा ताबा हे दोन्ही हातात आल्याशिवाय बुलेट ट्रेन जाऊ शकत नाही हे वास्तव आहे. याबाबत पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासोबत ईटीव्हीने बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, "महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यात 100टक्के भूसंपादन अद्यापही झालं नाहीे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांचा त्यासंदर्भात आक्षेप आणि विरोध देखील आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार आमच्या पातळीवर प्रक्रिया सुरू आहे."

राष्ट्रीय गती शक्ती रेल्वे महामंडळ म्हणाले : एकूण तिन्ही राज्यातील प्रकल्पाबाबत 97 टक्के काम पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाने सांगितले आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 98 टक्के भूसंपादनाचे काम झाले. दादर नागरा हवेली मध्ये शंभर टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये केवळ ७१.८३ टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील वनजमीन आणि शेतकऱ्यांची जमीन याबाबतचा मोठा अडथळा असल्यामुळे 30 टक्के अजूनही जमीन ताब्यात येणे बाकी आहे. तसेच वनजमिनी शिवाय इतर शेतजमीन आणि गावठाण यातील भूसंपादन बाकी असल्याचं राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी सांगितले.

Last Updated :Sep 30, 2022, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.