रविवारी तिन्ही रेल्वे मार्गिकेवर मेगाब्लाॅक; प्रवाशांचे होणार हाल

author img

By

Published : Sep 25, 2021, 2:24 AM IST

म

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर 26 सप्टेंबर, 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लाॅक घेतला आहे. त्यामुळे अप दिशेकडील जाणाऱ्या धिम्या मार्गावरील कळवा आणि मुंब्रा येथे लोकल थांबणार नाही.

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर 26 सप्टेंबर, 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लाॅक घेतला आहे. त्यामुळे अप दिशेकडील जाणाऱ्या धिम्या मार्गावरील कळवा आणि मुंब्रा येथे लोकल थांबणार नाही.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे, गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉग कालावधी पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

दहा तासांचा मेगाब्लॉक

विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर दिवा आणि ठाणे रेल्वे स्थानका रम्यान अप धिम्या मार्गावर 5 व्या आणि 6 व्या मार्गासाठी 10 तासांचा विशेष ब्लॉक आधीच जाहीर करण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत कल्याण येथून सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी ते संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटापर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीमी व अर्धजलद उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाईल. पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशीराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचेल.

पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी (दि. 26) सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकवेळी सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही दिशेकडील म्हणजेच अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. यामुळे विलेपार्ले येथे स्थानकाची लांबी कमी असल्याने लोकलला दोनदा थांबा दिला जाईल. तर राम मंदिर येथे फलाट नसल्याने येथे लोकल थांबणार नाही.

हेही वाचा - एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, परिवहन मंत्र्यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.