Maharashtra Live Breaking News : आम्ही आमच्या शाळा आणि शिक्षण व्यवस्थेची जाहिरात राजकारणासाठी केली नाही - आदित्य ठाकरे

author img

By

Published : May 11, 2022, 6:26 AM IST

Updated : May 11, 2022, 7:39 PM IST

महाराष्ट्र लाईव्ह ब्रेकिंग पेज

19:36 May 11

आम्ही आमच्या शाळा आणि शिक्षण व्यवस्थेची जाहिरात राजकारणासाठी केली नाही - आदित्य ठाकरे

आम्ही आमच्या शाळा आणि शिक्षण व्यवस्थेची जाहिरात राजकारणासाठी केलेली नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये बीएमसी शाळांमध्ये मुलांच्या गुणवत्तेच्या बाबतीत झपाट्याने वाढ झाली आहे. अभ्यासेतर क्रियाकलापांपासून ते डिजिटलायझेशनपर्यंत, आम्ही चांगली वाढ पाहिली आहे: महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे

19:00 May 11

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला निवडणूक

राज्यातील सहा जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे

18:18 May 11

कोपर्डी प्रकरणाची सुनावणी जलद गतीने करणार गृहमंत्र्यांची माहिती

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा संघटनांनी केलेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.कोपर्डी प्रकरणाची सुनावणी जलद गतीने करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

17:06 May 11

पुढील ३ ते ४ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार

आजमितीस पश्चिम राजस्थान आणि विदर्भात सुमारे 7-8 ठिकाणी 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमान आहे. उष्णतेची लाट कायम असून ती पुढील ३ ते ४ दिवस कायम राहणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट असू शकते अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी दिली आहे.

16:52 May 11

रेल्वे प्रवासात मास्क घालणे बंधनकारक; रेल्वे मंत्रालयाचे आदेश!

देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने खबरदारी म्हणून, रेल्वे प्रवासात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. याबाबदचे आदेश रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनल रेल्वेला दिले आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रवासात मास्क घालणे बंधनकारक राहणार आहेत.

15:23 May 11

भाजप आमदार जयकुमार गोरेंना तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

भाजप आमदार जयकुमार गोरेंना तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. गोरे हे माण - खटाव इथून विद्यमान आमदार तसेच भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत. मायणी येथिल जमीन वादाच्या प्रकरणात दहिवडी पोलीस स्थानकांत 14 एप्रिल रोजी दाखल आहे. जयकुमार गोरेंसह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा, दाखल असुन यात एका तलाठ्याचाही समावेश आहे. आरोपींना वडूज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्या मुळे उच्च न्यायालयात धाव घेतली होती

14:39 May 11

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला सुलेमान सेना बनवले - रवी राणा

नवी दिल्ली - बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाला मजबूत करण्यासाठी शिवसेनेची स्थापन केली होती, मात्र काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी सुलेमान सेना तयार केली आहे. त्यांच्यासोबत एक शकुनी मामा आहे, असेही रवी राणा म्हणाले. शकुनी मामा कोण, याचे उत्तर मात्र रवी राणा यांनी दिले नाही.

14:34 May 11

खासदार नवनीत राणा करणार संकट मोचन मंदिरात आरती, मुख्यमंत्र्यांना पुन्हा दिले निवडणूक लढण्याचे आव्हान

नवी दिल्ली - महाराष्ट्रावर आलेले संकट दूर करण्यासाठी संकट मोचन हनुमान मंदिरात आरती करणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उपस्थित होते. 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. त्याच दिवशी आम्ही 14 तारखेला सकाळी 9 वाजता कॅनॉट प्लेस येथील मंदिरात जाऊन आरती करणार आहे. महाराष्ट्रावर आलेले हे संकट दूर व्हावे यासाठी मी दिल्लीत आरती करणार आहे, असे नवनीत राणा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

13:27 May 11

राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही - बाळा नांदगावकर

मुंबई - मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या. भोंग्याच्या विषयावरून धमकीच पत्र आलं आहे. मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनाही धमकी दिली आहे आणि जिवे मारण्याची धमकी असल्यामुळे मी पोलीस आयुक्त यांना भेटलो. क्राईम कमिशनर यांना ते पत्र त्याची खरी प्रत दिली आहे. पुढे पोलीस काय कारवाई करतात ते बघू असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी. त्यांच्या कुटुंबासाठी राज्य सरकारने त्या जर केंद्र सरकारनेही दखल घ्यावी, असेही ते म्हणाले.

13:24 May 11

मुंबई - अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अबूधाबीला जाण्याची परवानगी देण्याची विनंती तिने केली आहे. मनी लाँडरींग प्रकरणी जॉकलीनवर आरोप आहेत. त्यामुळे तिली देशाबाहेर जाता येत नाही.

13:20 May 11

राज ठाकरे यांनी धर्माचे राजकारण बंद करावे - अबू आजमी

मुंबई - राज ठाकरे यांनी धर्माचं राजकारण बंद करावं, अन्यथा श्रीलंकेसारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवेल. समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी या शब्दात राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. राज ठाकरे यांना कोणतेही राजकीय स्थान नाही. त्यामुळे ते सातत्याने आपली भूमिका आणि आपल्या पक्षाचा झेंडा बदलत आहेत. मात्र तरीही त्यांना महाराष्ट्रातली जनता कधीही स्वीकारणार नाही, असा दावा अबू आजमी यांनी केला. कायदा हातात घेऊन विनाकारण एखाद्याला त्रास दिल्यास नक्कीच प्रतिक्रिया उमटते असेही अबू आझमी म्हणाले.

12:27 May 11

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा राणा दांपत्याचा दावा

नवी दिल्ली - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. सध्या दोघेही दिल्लीत असून खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी दुपारी २ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईतील खार येथील घराला दिलेल्या नोटिसीबाबत या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्य आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा राणा दांपत्याने दावा केला आहे. आता पत्रकार परिषदेत आणखी काय आरोप केले जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

12:24 May 11

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरची श्रद्धांजली

मुंबई - अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अखेरची श्रद्धांजली वाहिली आहे. शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी निधन झाले.

11:51 May 11

सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाचा कायदा केला स्थगित

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोह कायद्याला स्थगिती दिली आहे. केंद्र सरकार आणि याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती देण्यासोबतच नवीन खटल्याच्या नोंदणीलाही स्थगिती दिली आहे. ( Treason Law ) या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. तोपर्यंत केंद्र सरकारला या कायद्याचा पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाने सांगितले की, या काळात केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वे देऊ शकते.

11:32 May 11

राजद्रोह कायदा प्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवण्यापासून रोखता येणार नाही - केंद्रसरकार

राजद्रोह कायदा प्रकरणी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की दखलपात्र गुन्हा नोंदवण्यापासून रोखता येणार नाही

मात्र छाननीसाठी जबाबदार अधिकारी असणे आवश्यक आहे

11:14 May 11

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

मनसेच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईवर केली चर्चा

नांदगावकर यांनी कालच घेतली होती मुंबईचे पोलीस आयुक्त व सहाय्यक आयुक्तांची भेट

नांदगावकर व गृहमंत्री यांच्यात झाली वीस मिनिटे चर्चा

गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर नांदगावकर जाणार शिवतीर्थावर, भेटीचा संपूर्ण तपशील राज ठाकरे यांना देणार

10:45 May 11

मनी लाँड्रींग प्रकरणात खनिकर्म विभागाच्या सचिव पूजा सिंगल ईडी चौकशीसाठी दाखल

मनी लाँड्रींग प्रकरणात खनिकर्म विभागाच्या सचिव पूजा सिंगल ईडी चौकशीसाठी दाखल, ईडीनं बजावलं होतं समन्स

09:46 May 11

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार

मुंबई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार आहे.

आज दिवसभर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार

भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.

08:56 May 11

मध्य प्रदेशचे मंत्री इंदरपाल सिंह यांची सून गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ

मध्य प्रदेशचे मंत्री इंदरपाल सिंह यांची सून गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ

08:00 May 11

आंध्रप्रदेशमध्ये समुद्र खवळला, सायक्लॉन असनीचा धोका वाढला

आंध्रप्रदेशमध्ये समुद्र खवळला

जोरदार वारे वाहत असल्याने नागरिक धास्तावले

सायक्लॉन असनीचा धोका वाढला

समुद्र किनाऱ्यावरील वाहतुकीत बदल

पीच रोर खचल्याची पोलिसांची माहिती

किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

07:42 May 11

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुख राम यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले

त्यांचे पुत्र अनिल शर्मा यांनी ही माहिती दिली.

त्यांना नवी दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते

त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकचा उपचार सुरू होता.

07:10 May 11

मलबार हिल परिसरात तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा बंद

मलबार हिल परिसरात तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा बंद.

विद्युत पुरवठा पुर्ववत करण्याचे काम सुरू - जनसंपर्क अधिकारी

06:55 May 11

संजय राऊत यांचा किरीट सोमैया यांच्यावर पुन्हा हल्लाबोल

संजय राऊत यांचा किरीट सोमैया यांच्यावर पुन्हा हल्लाबोल

मोतीवाल ओसवाल यांच्याकडून युवक प्रतिष्ठानला दोन वर्षात लाखोंच्या देणग्या

किरीट सोमय्या यांनी 5600Cr एनएसईएल घोटाळ्याची डीएमएनडीएस चौकशी केली आणि डी कंपनीच्या शिपाईच्या घरी 2 देखावे तयार केले

आणि नंतर -2018-19 मध्ये, सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल कंपनीकडून 2 वर्षांच्या लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या!

क्रोनॉलॉजी समजून घ्या

06:16 May 11

Maharashtra Live Breaking Update - मनमाडमध्ये कार अपघातात ४ मित्र ठार

मनमाड शहरातील चार मित्रांवर काळाने घाला घातला आहे. एका कार्यक्रमावरून घरी परत येत असताना कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. यात 4 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-इंदूर महामार्गावर मनमाडनजीक अनकवाडे शिवारात ही घटना घडली आहे.

Last Updated :May 11, 2022, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.