Maharashtra Live Breaking News; राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय!
Updated on: May 13, 2022, 6:08 PM IST

Maharashtra Live Breaking News; राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय!
Updated on: May 13, 2022, 6:08 PM IST
18:02 May 13
राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यां कडे केली होती. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवावी अशी विनंतीही करण्यात आली होती. त्यानुसार आज राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
17:03 May 13
पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लुटले
ठाणे : भिवंडी तालुक्यातील पडघा भागात असलेल्या एका पेट्रोल पंपावर काही अनोळखी लुटारूंनी पिस्तूल सारख्या दिसणारे हत्यार दाखवून कर्मचाऱ्यांकडे असलेल्या पैसांच्या बॅग आणि मोबाईल चोरून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलीसांनी अधिक तपास सुरू केला आहेत.
15:52 May 13
आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख यांना 20 मे पर्यंत एनआयए कोठडी
मुंबई: दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसह डी-कंपनी प्रकरणातील संशयित आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख यांना 20 मे पर्यंत एनआयए कोठडी
15:52 May 13
बॉम्बनाशक पथकाकडून खुल्या मैदानात वस्तू निकामी
पुणे रेल्वे स्थानकात संशयास्पद वस्तू सापडली होती. ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती. मात्र पोलिसांनी ही वस्तू हस्तगत केली. त्यानंतर बी जे मेडिकल कॉलेजच्या खुल्या मैदानात ही वस्तू निकामी करण्यात आली आहे.
13:52 May 13
उत्तर प्रदेशात मदरशात राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाचे स्वागत - आचार्य तुषार भोसले
मुंबई - उत्तर प्रदेशात मदरशात राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या योगी सरकारच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे. धार्मिक आणि शालेय शिक्षणासोबत राष्ट्रभक्ती देखील रुजणे गरजेचं आहे. म्हणून आता महाराष्ट्रातल्या मदरशांतही राष्ट्रगीत बंधनकारक करावे ही आमची राज्य सरकारकडे मागणी
12:28 May 13
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सापडली बॉम्बसदृश्य वस्तू
पुणे- पुण्यातील रेल्वे स्टेशन येथे बॉम्ब सदृश्य वस्तू आढल्याने पुणे रेल्वे स्टेशन परिसर पुणे पोलिसांच्याकडून रिकामा करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनच्या कांड्या पोलिसांनी घेऊन निकामी करण्याची कारवाई सुरू केली, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
12:17 May 13
नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची कोर्टाची परवानगी
मुंबई - नवाब मलिक यांनी तूर्तास दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिलीय. मुंबईतील कुर्ल्याच्या criticare रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहायचीही कोर्टाने मुभा दिली आहे.
11:55 May 13
नितेश राणे यांचे ट्विटमधून ओवेसींना आव्हान
-
मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!
मुंबई - आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन ओवेसींवर निषाणा साधला आहे. त्यांनी पोलिसांना १० मिनीटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही असे ट्विट केले आहे. यापुढेही या प्रकरणी आणखी राजकीय धुरळा उडणार असेच यावरुन दिसत आहे.
11:33 May 13
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्या संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन
पुणे - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. आज सकाळी पुण्यात त्यांची प्राणज्योत मालवलीे.
11:25 May 13
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
मुंबई - शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अंधेरी येथील लटके यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. लटके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना दिल्यात.
10:56 May 13
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
मुंबई - शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्यात. लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले होते. त्यांचे पार्थिव मुंबईत आणले असून त्यांच्यावर अंधेरीतील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येतील.
09:33 May 13
अंगडिया खंडणी प्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस
-
Angadiya extortion case | An LOC (Look Out Circular) issued against suspended IPS officer Saurabh Tripathi. Mumbai Police is soon going to file a supplementary charge sheet in this case: Mumbai Police
— ANI (@ANI) May 13, 2022
Saurabh Tripathi is absconding in the recovery case for the last 2 months.
मुंबई - अंगडिया खंडणी प्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात एलओसी (लूक आउट सर्क्युलर) जारी करण्यात आले आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहेत. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. सौरभ त्रिपाठी वसुली प्रकरणात गेल्या 2 महिन्यांपासून फरार आहे.
09:14 May 13
पाईप फुटल्याने कोल्हापूरचा पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर - कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटली आहे. त्यामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा बंद पडलाय. बालिंगा पाणी उपसा केंद्रातून चंबुकडी येथे जाणारी पाईप लाईन फुटली. पाईपलाईन फुटल्याने जवळपास पस्तीस फुट उंच फवारे उडत होते. या पाण्यामुळे जवळपासच्या शेतीचेही नुकसान झाले.
09:05 May 13
डी-कंपनी प्रकरणात आरिफ अबुबकर शेख (५९ वर्ष) आणि शकील शेख उर्फ छोटा शकील (५१ वर्ष) या दोन संशयितांना अटक
-
NIA arrests 2 suspects, namely Arif Abubakar Shaikh (59y/o) & Shakeel Shaikh alias Chhota Shakeel (51y/o), in the D-company case, involving Dawood Ibrahim Kaskar & his associates. The suspects will be produced before the NIA Special Court today for seeking Police custody.
— ANI (@ANI) May 13, 2022
मुंबई - एनआयएने दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथीदारांचा समावेश असलेल्या डी-कंपनी प्रकरणात आरिफ अबुबकर शेख (५९ वर्ष) आणि शकील शेख उर्फ छोटा शकील (५१ वर्ष) या दोन संशयितांना अटक केली. संशयितांना आज पोलीस कोठडीसाठी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. इंटरपोलने पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवणाऱ्या छोटा शकीलविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तो खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे NIA ने 9 मे रोजी महाराष्ट्रात 29 ठिकाणी छापे टाकले होते.
08:15 May 13
नवसंकल्प शिबिरासाठी राहुल गांधी उदयपूरमध्ये दाखल
-
Rajasthan | Congress leader Rahul Gandhi arrives in Udaipur for the party's Chintan Shivir to be held today pic.twitter.com/UrpHyfmo3j
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 13, 2022
उदयपूर - काँग्रेसनेते राहुल गांधी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नवसंकल्प चिंतन शिबीर होत आहे. या शिबिरासाठी राहुल गांधी उदयपूरमध्ये आले आहेत. काँग्रेस नेत्यांची मोठी उपस्थिती या ठिकाणी असणार आहे. काँग्रेसची पुढील राजकारणाची दिशा या शिबिरात ठरवण्यात येईल.
07:14 May 13
महागाई 7.79 टक्क्यांनी वाढली
-
Retail inflation jumps record 7.79 pc, economists believe RBI will continue to increase repo rates
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/NgZenFAQkc#inflation #RetailInflation #RBI pic.twitter.com/QGiJWJxbjC
मुंबई - सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल 2022 साठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाई 7.79 टक्क्यांनी वाढली आहे. जी या वर्षी मार्चमध्ये 6.95 टक्के आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 4.23 टक्के होती. किरकोळ महागाई 7.79 टक्के ही 19 महिन्यांतील विक्रमी उच्चांकावर आहे. कारण पूर्वीचा सर्वोच्च महागाई दर ऑक्टोबर 2020 मध्ये 7.61 टक्के नोंदवला गेला होता.
06:33 May 13
Maharashtra Live Breaking News_13 May 2022
पुणे - माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की पाकिस्तानातील सामान्य जनता आमचे विरोधक नाहीत. ज्यांना राजकारण करायचे आहे आणि सैन्याच्या मदतीने सत्तेवर नियंत्रण ठेवायचे आहे ते संघर्ष आणि द्वेषाला अनुकूल आहेत. पण बहुसंख्य लोकांना पाकिस्तानमध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचे आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी या प्रकारचे मत पुण्यात व्यक्त केले.
