Kurla Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरण; घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल

author img

By

Published : Jun 29, 2022, 4:08 PM IST

Kurla Building Collapse

कुर्ला येथील नाईक नगर सोसायटीमधील डी विंग कोसळून (Kurla Building Collapse) 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ( Police ) इमारतीमधील घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - कुर्ला येथील नाईक नगर सोसायटीमधील डी विंग कोसळून (Kurla Building Collapse) 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ( Police ) इमारतीमधील घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज ही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात असून बाजूच्या धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरु आहे.

नेहरू नगर पोलिस ठाणे हद्दीतील नाईक नगर को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई ही तळ अधिक तीन माळ्याची इमारत रात्री 11:30 वाजेच्या सुमारास कोसळली. सदर अपघाता दरम्यान एकूण 19 रहिवाशांचा मृत्यू व 15 जण जखमी झाले आहेत. ही इमारत राहण्यास धोकादायक असल्याचे महानगरपालिका यांनी यापूर्वी घोषित केले होते. तरीदेखील घर मालक व इतर अनोळखी इसमाने भाडेकरू इसमांना राहण्यास दिली व त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाले आहेत. यासाठी रजनी राठोड, किशोर नारायण चव्हाण, बाळकृष्ण राठोड, व इतर घर मालक तसेच दिलीप विश्वास यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ऑडिटरवर कारवाई होणार -
कुर्ला नेहरू नगर येथील नाईक नगर सोसायटीमधील ४ इमारती १९७३ मध्ये बांधण्यात आल्या होत्या. २०१६ मध्ये या इमारतींना धोकादायक जाहिर करण्यात आले होते. इमारतीचे लाईट आणि पाणी कापण्यात आले होते. मात्र, सोसायटीने इमारत दुरुस्त करता येऊ शकते असा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केला. यामुळे इमारतीला धोकादायक यादीमधून वगळण्यात आले होते. ही इमारत कोसळल्याने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देणाऱ्या ऑडिटरची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

हेही वाचा - Kishori Pednekar Threat To Kill : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.