MLC Election 2021 : विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोध, तर दोन जागांवर होणार लढत

author img

By

Published : Nov 26, 2021, 10:25 PM IST

Updated : Nov 26, 2021, 10:48 PM IST

vidhan bhavan

राज्याच सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Maharashtra MLC election) रणधुमाळी सुरू आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध (Four Seats Unopposed) करण्याचा निर्णय झाला. दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होणार आहे.

मुंबई - राज्याच सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Maharashtra MLC election) रणधुमाळी सुरू आहे. आज (26 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जोरदार राजकीय घडामोडी घडत होत्या. अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत अनेक राजकीय चर्चा सुरूच होत्या. शेवटी तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध (Four Seats Unopposed) करण्याचा निर्णय झाला. दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होणार आहे.

  • या जागा झाल्या बिनविरोध -

बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे एक आणि नंदुरबारच्या एक जागेचा समावेश आहे. नागपूर आणि अकोला येथील जागेवर लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस, तर अकोला येथे शिवसेना विरुद्ध भाजप लढत होत आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये भाजपा उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. धुळ्यामध्ये भाजपाचे अमरिश पटेल हे बिनविरोध होत आहेत. मुंबईमध्ये बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजपाचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची वर्णी लागली आहे.

  • या दोन जागांवर होणार निवडणूक -

नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार भोयर यांच्या लढत होणार आहे. तर, अकोला-वाशीम-बुलढाणा मतदारसंघात भाजपकडून वसंत खंडलवाल आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजेरिया हे निवडणूक रिंगणात आहेत.

Last Updated :Nov 26, 2021, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.