Nana Patole : न्यायालयाच्या निर्णयाचे परीक्षण करू - नाना पटोले

author img

By

Published : Jun 27, 2022, 5:24 PM IST

Nana Patole

आमदारांच्या अपात्र संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) पुढील सुनावणी 11 तारखेला ठेवली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे, याचे परीक्षण करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई - आमदारांच्या अपात्र संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) पुढील सुनावणी 11 तारखेला ठेवली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे, याचे परीक्षण करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जैसे थे परिस्थिती 11 जुलै पर्यंत राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे अथवा विधिमंडळाच्या अधिकार्‍यांमध्ये हस्तक्षेप केले आहे. किंवा नक्की काय झाले आहे. याबाबत आपण परीक्षण करून, त्यावर बोलू अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

विश्वासमतासाठी राज्यपाल ठरवतील - राज्यामध्ये विश्वासमत घेतले, जाण्याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया आहे. याबद्दल विचारले असता या संदर्भातील निर्णय राज्यपाल घेतील. विश्वास मत घ्यावे किंवा नाही हा राज्यपालांचा विषय आहे. तेच याबाबत निर्णय घेतील, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा- Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.