Health Department Exam : परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र.. आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Oct 17, 2021, 4:45 PM IST

Health Department Exam

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट 'क' संवर्गातील पदभरतीचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

मुंबई - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट 'क' संवर्गातील पदभरतीचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आल्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदभरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी एक संवर्ग राज्य, मुंबई स्तरावरील आहे. २३ संवर्ग राज्य, पुणे स्तरावरील आहेत. तर आठ मंडळ स्तरावर २८ संवर्ग आहेत. राज्य स्तरावरील नियुक्ती अधिकारी संबंधित सहसंचालक तर मंडळ स्तरावर संबंधित उपसंचालक नियुक्ती अधिकारी आहेत. न्यासा कम्युनिकेशन कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. गट क मधील ५२ संवर्गातील २७३९ पदांसाठी ४,०५,१६३ अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत २,०७,१३७ प्रवेशपत्र डाऊनलोड केल्याचे संचालक पाटील म्हणाले.

अधिकाधिक उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न -

जास्त उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत. उमेदवारांने अनेक पदांसाठी अर्ज केला तरीही ज्या पदाच्या परिक्षेसाठी बसतील त्याच पदाच्या नियुक्तीसाठी त्यांचा विचार केला जाईल. ५२ संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. एका शिफ्टमध्ये दहावी ते बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी तर दुसऱ्या शिफ्टमध्ये पदवी आणि त्यावरील शैक्षणिक पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांचा समावेश केला आहे. परीक्षा केंद्र देताना उमेदवारांच्या प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. उमेदवारांनी एका मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी एकाच शहरात दोन शिफ्टमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. पुणे, नाशिक, अकोला मंडळात जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या मंडळातील उमेदवारांना नजिकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे दिली आहेत.

हे ही वाचा - शरद पवार मोठे नेते आहेत यात वाद नाही, मात्र त्यांनी लहान नेत्यांवर बोलले पाहिजे - पंकजा मुंडे

दिव्यांग उमेदवारांना जवळचे केंद्र -

उमेदवारांना शक्यतो जवळचे केंद्र दिले आहे. मात्र वेगवेगळ्या नेमणूक अधिकाऱ्यांचे अंतर्गत अर्ज केला असल्यास त्या कार्यक्षेत्रात केंद्र देण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर छायाचित्र आणि सही अस्पष्ट असल्यास उमेदवारांनी न्यासा कम्युनिकेशन कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक पाटील यांनी केले.

हे ही वाचा - अजित पवारांच्या बहिणी 'जरंडेश्वर'मध्ये भागीदार; शरद पवारांना किरीट सोमैयांचे खुले आव्हान, म्हणाले..

माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नाही -

माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नसल्याने नऊ हजार माजी सैनिकांना प्रवेश पत्र देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात नागपूर नावाचे गाव आहे. ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे प्रवेशपत्रावर अहमदनगर जिल्हा नमूद केला आहे. काही प्रवेश पत्रात पिनकोड चुकला आहे. मात्र पत्ता बरोबर आहे. पिनकोड सुधारणा केली जाईल, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.