Ajit Pawar on Nana Patole : हेडलाईन मिळवण्यासाठी ते वक्तव्य बरं वाटते; उपमुख्यमंत्र्यांचा टोला

author img

By

Published : May 12, 2022, 12:26 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्यक्तव्य केलं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला. वास्तविक त्यांचं स्टेटमेंट हास्यास्पद आहे. हेडलाईन मिळविण्याकरता ते वाक्य बरं वाटते. परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करतो, अशी टीका पवार यांनी केली.

मुंबई - उसाच्या गळीत हंगामाला योग्य मदत देण्याचे काम सरकार करत आहे, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. कदाचित वेगळा प्रसंग आला तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही टोकाची भूमिका कृपा करून घेऊ नका, अशी ही विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी एक व्यक्तव्य केलं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला. वास्तविक त्यांचं स्टेटमेंट हास्यास्पद आहे. हेडलाईन मिळविण्याकरता ते वाक्य बरं वाटते. परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करतो, असेही ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतच्या निवडणुकीबाबत निर्णय दिला आहे. त्यामध्ये १५ दिवसांमध्ये कार्यक्रम जाहीर करा असे सांगितले आहे. त्याबद्दल निवडणूक आयोगाचे जे मत आहे, ते त्यांनी सुप्रीम कोर्टात मांडले आहे. त्यांचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. राजद्रोहाचे कलम इंग्रज काळापासून आलेलं आहे. काही सूचना केंद्र सरकारला केल्या आहेत. यापुढे या कलमाचा वापर करू नये असे सांगण्यात आले आहे. संविधानाचे आपण पालन करत असतो त्या पद्धतीने करावे लागेल.

मुंबईत उत्तर प्रदेश कार्यालय - कोणी कुठे कार्यालय काढावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदन किंवा इतर राज्यांची सदने आहेत. मुंबईतही इतर राज्यांची काही सदन काढण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रात उभ्या भारतातून बरेच लोक येतात. उत्तर प्रदेश, नॉर्थ, साऊथ, बिहारचे असतात. त्यामुळे काही वेगळ्या पद्धतीची मनामध्ये कल्पना ठेवून युपी सरकारने तो निर्णय घेतला असेल तर घाबरायच कारण नाही. आम्हाला वाटलं तर उद्या उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा कार्यालय काढू शकतो. पण एकंदरीत लोकांनी त्यातून गैरसमज निर्माण करून घेण्याच, घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यासंदर्भात कुठेही कोणालाही कार्यालय उभारता येतात, काढता येतात याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे ते म्हणाले.

नाना पटोले यांना टोमणा - काँग्रेस प्रदेशाध्यक्षा यांनी एक व्यक्तव्य केलं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला. वास्तविक त्यांचं स्टेटमेंट हास्यास्पद आहे. हेडलाईन मिळविण्याकरता ते वाक्य बरं वाटते. परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो. परंतु राज्यात निर्णय घेताना राज्य पातळीचे नेते निर्णय घेतात. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात. तेथील राजकीय, भौगोलिक परिस्थिती वातावरण योग्य रहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष आघाडीमध्ये समन्वय बघावा लागतो. काँग्रेस सुद्धा काही ठिकाणी जिल्हा, स्थानिक स्तरावर भाजपबरोबर एकत्र गेलेली आहे. पण मी त्याला फार महत्व देत नाही, असेही ते म्हणाले.

नांदगावकर यांच्या तक्रारीची दखल घेणार - मनसे नेते बाळा नांदगावकर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना भेटले. राज्यातील कुठल्याही व्यक्तीला सुरक्षित वाटण्यासारखी परिस्थिती सातत्याने टिकवणे हे सरकारचं, पोलीस खात्याचे काम आहे. म्हणून गृहमंत्री निश्चित त्याच्यामध्ये लक्ष घालतील. पत्र कुठून आले, त्याच्यामागे कोणता हेतू आहे याची माहिती घेतली जाईल. राज्यस्तरावरील कमिटी असते. त्यामध्ये सर्व अधिकारी असतात. वरिष्ठ ते ठरवतात, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.