Couple Suicide Attempt Mantralaya : मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Updated on: May 12, 2022, 5:04 PM IST

Couple Suicide Attempt Mantralaya : मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Updated on: May 12, 2022, 5:04 PM IST
अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर एका दाम्पत्याने आत्महत्येचा ( couple attempts suicide at Mantralaya premises ) करण्याचा प्रयत्न केला आहे. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास होत असल्याचे कारण सांगत या दाम्पत्याने हा प्रयत्न केला आहे.
मुंबई - दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने आपल्या कुटुंबासह अंगावर रॉकेल ओतून ( couple attempts suicide at Mantralaya premises ) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राजू चन्नाप्पा हुनगुंडे, असे या व्यक्तीचे नाव असून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका, माळवटा ( Family from Wasmat taluka Hingoli district ) गावाचे ते रहिवासी आहे. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानंतर प्रसंगावधान दाखवत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी या कुटुंबाला वेळीच अडवले आणि पुढचा अनर्थ टळला.
काय आहे प्रकरण ? : नांदेड जिल्ह्यातील पालम रोड धानोरा काळे येथे आठ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी बिल पास करत नाही. आपल्याजवळ कमिशन मागतात. याआधी त्यांना एकदा पंधरा लाख रुपये देऊनही पुन्हा दहा लाखाची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. माझ्याकडे आता पैसे उरले नाहीत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणतीही दयामाया दाखवत नाही. त्यामुळे नांदेड येथे आपण उपोषणही केले होते. मात्र आपले उपोषण अधिकाऱ्यांनी मोडून काढले. त्या उपोषणाच्या वेळी आपल्या आणि आपल्या पत्नीला मारहाण करण्यात आली होती. मात्र याची तक्रार पोलिसांकडून घेतली जात नाही. आम्हाला न्याय मिळत नाही, असे म्हणत राजू चन्नाप्पा हुनगुंडे या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभाग आवर गंभीर आरोप केले आहेत.
'...म्हणून केला आत्महत्येचा प्रयत्न' : आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही आपल्याला कोणताच दिलासा मिळालेला नाही. आतापर्यंत केवळ आपल्याला पंधरा लाख रुपयांचे बिल देण्यात आले. मात्र अद्यापही 1 कोटी 70 लाख रुपये शिल्लक आहेत. ते मिळत नसल्यामुळेच आपल्याकडे कोणताही मार्ग उरला नसल्याने आपण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे या कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतल असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा - Sharad Pawar : भाजपने केलेल्या टिकेला शरद पवारांचे प्रत्त्युत्तर; म्हणाले, 'या कवितेत कष्टकऱ्यांच्या...'
