CM Uddhav Thackeray on BJP : ..तर हे दाऊदलाही भाजपमध्ये घेतील, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

author img

By

Published : May 14, 2022, 8:38 PM IST

Updated : May 14, 2022, 11:05 PM IST

CM Uddhav Thackeray news Mumbai

फडणवीस म्हणाले ( CM Uddhav Thackeray on Devendra FRadnavis ) होते, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, तुमच्या 1707 पीढ्या जरी आल्या तरी ते होऊ देणार नाही. मुंबई आंदन म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे, तिला हिरवणाऱ्यांचे तुकडे करणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray on BJP ) यांनी भाजपला दिला आहे.

मुंबई - फडणवीस म्हणाले ( CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis ) होते, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, तुमच्या 1707 पीढ्या जरी आल्या तरी ते होऊ देणार नाही. मुंबई आंदन म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे, तिला हिरवणाऱ्यांचे तुकडे करणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray on BJP ) यांनी भाजपला दिला आहे.

हेही वाचा - Ketaki Chitale Controversy : कोण आहे केतकी चितळे?, का आली अडचणीत

आज मुंबईतील बीकेसी ( Uddhav Thackeray news Mumbai bkc ) येथील शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून ( CM Uddhav Thackeray on Hindutva in Mumbai ) भाजपला धारेवर धरले.

खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष देशाची दिशी भरकटवत आहे. आमचा हिंदुत्व अतिरेक्यांना बडवणारा हिंदुत्व आहे. गाढव आमच्या सोबत होते, त्यांनी लात मारायच्या आत आम्ही त्यांना लात मारली, असे देखील उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray news Mumbai ) म्हणाले. काँग्रेसमध्ये गेलो कारण तुम्ही ढकलले. सत्ता गेली तरी फरक पडत नाही. आमचे हिंदुत्व तकलादू नाही. हिंदुत्व म्हणजे धोतर वाटले का. बोगस हिंदुत्ववादीने मुफ्तीसोबत सत्ता स्थापन केली, डोक्यात भगवी टोपी घालून हिंदुत्व सिद्ध होत नाही, तो मेंदूत असावा लागतो. आम्हाला घर पेटवणारे हिंदुत्व नाही, चुल पेटवणारे हिंदुत्व हवे आहे. राम, हनुमान यांचा अपमान करू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाऊदचाही उल्लेख केला. उद्या दाऊद भाजपमध्ये येतो म्हणाला तर हे लोक त्यालाही मंत्री बनवतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. ठाकरे यांनी महागाईवरून देखील भाजपला लक्ष केले. विरोधक महागाईवर बोलायला तयार नाही. महागाईवर आंदोलन करणारे अटल बिहारी वाजपेयी होते. आता तो भाजप राहिलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार पडणार नाही, गलिच्छ राजकारण करू नका, सरळ लढा, मागे उगाच लागाल तर दयामया करणार नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.

मुंबईतील बीकेसीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा झाली. गेल्या एक महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घटनांमध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आले. राणा दाम्पत्याचा हनुमान चालिसा मुद्दा, आयोध्या भेट, हिंदुत्व, केतकी चितळे यांची पवारांवरील पोस्ट या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील याकडे आज सर्वांचे लक्ष लागले होते.

बीकेसीत झालेल्या या सभेला शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी ओवैसी बंधूंचा समाचार घेतला. अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये औरंगझेबच्या कबरीचे दर्शन घेतले होते. यावर राऊत यांनी ओवैसींना चांगलेच फटकारले.

हेही वाचा - ती तर बारमध्ये काम करणारी, विद्या चव्हाण यांची नवनीत राणांवर जहरी टीका

Last Updated :May 14, 2022, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.