BMC Mayor on Children Vaccination: आडमुठेपणा ठेवून जर लस घेत नसाल तर मग महामारी कायदा लावू - किशोरी पेडणेकर

author img

By

Published : Jan 14, 2022, 3:17 PM IST

किशोरी पेडणेकर

मुंबईकरांसाठी मकर संक्रातीच्या दिवशी पालिकेच्यावतीने 89992 28999 या नंबरवर व्हॉटसअप चॅट बॉट सेवा सुरू ( BMC chatbot for vaccination ) करण्यात आली आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढविण्यासाठी पालकांनी पुढे यावे, असे आवाहन ( BMC Children vaccination target ) महापौरांनी केले.

मुंबई - आडमुठेपणा ठेवून जर लस घेत नसाल तर मग महामारी कायदा लावून लसीकरण करावे लागेल. तशी वेळ आणू नका असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ( Kishori Pednekar warning over children vaccination ) दिला. गेले काही दिवस लहान मुलांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने ठरवेले लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होताना ( BMC Children vaccination target ) दिसत नाही.

मुंबईकरांसाठी मकर संक्रातीच्या दिवशी पालिकेच्यावतीने 89992 28999 या नंबरवर व्हॉटसअप चॅट बॉट सेवा सुरू ( BMC chatbot for vaccination ) करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना व्हॉटसअपवर माहिती उपलब्ध केली जाणार आहे. या सेवेच्या लोकार्पणानंतर महापौर किशोरी पेडणेरकर म्हणाल्या, की डोससाठी मागणी वाढत आहे. त्याप्रमाणे पुरवठा वाढला पाहिजे. दोन डोसमधील कालावधी कमी करायला हवा, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढविण्यासाठी पालकांनी पुढे यावे, असे आवाहन महापौरांनी केले. अॅलर्जी असणारे काहीजण लस घेत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा-Goa Election : तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? - उत्पल पर्रीकर

शेलार यांच्याबरोबरील वाद बसून सोडवू -
भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्याबरोबर महापौर किशोरी पेडणेकर यांचे ( Kishori Pednekar over clashes with Ashish Shelar ) वाक्युद्ध झाले. त्याबाबत बोलताना महापौर म्हणाल्या, की ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या वेदनादायक आहेत. आशिष शेलारांकडून ही अपेक्षा नव्हती. न्यायालयाच्या मतानुसार आम्ही चर्चा करणार आहोत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून आम्ही निर्णय घेवू असे महापौर म्हणाल्या.

हेही वाचा-Kamal Khan Passes Away : ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन; पत्रकारिता विश्वात शोककळा

मराठी परिपत्रक हवे -
राज्य सरकारने दुकानातील पाट्या मराठीत करण्याचा निर्णय ( BMC mayor on Marathi board on shop ) घेतला आहे. याबाबत बोलताना १९७२ पासून आम्ही मराठीची भूमिका मांडत आलो आहोत. जिथो राहतोय तिथे मराठी भाषाच हवी. परिपत्रकही मराठीतच हवे, ( BMC circulars in Marathi ) यासाठी मी प्रशासनाला आदेश देणार असल्याचे महापौरांनी म्हटले.

हेही वाचा-पतंग उडवा पण आपल्यामुळे कोणाला इजा पोहोचणार नाही याचीही घ्या काळजी; ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.