BMC Action Illegal Huts : गोवंडीतील 215 अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेचा बुलडोझर

BMC Action Illegal Huts : गोवंडीतील 215 अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेचा बुलडोझर
गोवंडी परिसरात मोकळ्या भूखंडावर २१५ झोपड्या उभारण्यात आल्या( Govandi Illegal Huts ) होत्या. त्यावर महापालिकेतर्फे कारवाई करण्यात आली ( Bmc Action Against Illegal 215 Huts ) आहे.
मुंबई - मुंबईत मिळेल त्या मोकळ्या जागेवर अनधिकृत बंधकाम केले जाते. गोवंडी परिसरात अशाच मोकळ्या भूखंडावर २१५ झोपड्या उभारण्यात आल्या ( Govandi Illegal Huts ) होत्या. त्यांनी संरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पालिकेने न्यायालयात मांडलेल्या बाजूनंतर झोपडीधारकांची याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर पालिकेने या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली ( bmc action against illegal 215 Huts ) आहे.
अनधिकृत झोपड्यांवर कारवाई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम/पूर्व’ विभाग हद्दीतील प्रभाग क्रमांक १४४ मधील सीटीएस क्रमांक ५/६, देवनार गांव, पाटीलवाडी, गोवंडी, मुंबई येथे खासगी मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यावर तात्काळ नोटीस देऊन काल (दिनांक १० मे २०२२) गोवंडी परिसरातील २१५ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘एम/पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी दिली
न्यायालयाने याचिका फेटाळली - उच्च न्यायालयात अनधिकृत झोपड्यांना कारवाई करुन यासाठी नोटीसधारकांनी खटला दाखल केला होता. परंतु, महापालिकेच्या सतर्कतेमुळे व प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने स्थगिती आदेश दिले नाही व नोटीसधारकांची याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेतर्फे दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी नोटीसधारकांस अंतिम आदेश पारित करण्यात आले व काल ( दिनांक १० मे २०२२ ) ‘एम/पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्या पुढाकाराने सदर ठिकाणी बांधण्यात आलेल्या २१५ झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. सदर कामी गोवंडी पोलीस ठाण्याकडून तात्काळ पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.
