BJP Assembly Mission 98 : भाजपचे विधानसभा मिशन ९८ ठरणार शिंदे गटासाठी डोकेदुःखी?

author img

By

Published : Sep 23, 2022, 12:16 PM IST

CM and Deputy CM having Tea with Fellow Ministers

विधान सभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६४ जागी विजय संपादन केला ( CM to Re Elect MLAs Belonging to Shinde Group ) आहे. अशात आता भाजपचे मिशन लोकसभेपाठोपाठ मिशन विधानसभा हे शिंदे गटासाठी नाही म्हटली तरी धोक्याची घंटा असणार ( CM to Re Elect MLAs Belonging to Shinde Group ) आहे.

मुंबई : भाजपने महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन ४५ ची घोषणा ( BJP Announced Mission 45 For Lok Sabha in Maharashtra ) केल्यानंतर आता विधानसभेसाठी मिशन ९८ ची घोषणा करण्यात आली आहे. विशेष करून भाजप यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत ( CM to Re Elect MLAs Belonging to Shinde Group ) आहे.

शिंदे गटासाठी धोक्याची घंटा : विधान सभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६४ जागी विजय संपादन केला आहे. अशात आता भाजपचे मिशन लोकसभेपाठोपाठ मिशन विधानसभा हे शिंदे गटासाठी नाही म्हटली तरी धोक्याची घंटा असणार ( BJP Assembly Mission Headache For Shinde Group ) आहे.


शिंदे गटाची ताकद वाढवणे मुख्यमंत्र्यांना आव्हान : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात जरी आले असले तरी खरी लढाई ही २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची असणार आहे, हे सर्वश्रुत आहे. या लढाईसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, त्या दृष्टीकोनातून आता तयारीही सुरू झाली आहे. राज्यात १ नंबरचा असलेल्या भाजपने यासाठी मिशन लोकसभा, विधानसभा सुरू केले आहे. पण, भाजपच्या या मिशनवर शिंदे गटाचे बारकाईने लक्ष लागले आहे. शिंदे गटासोबत असलेल्या आमदारांना पुन्हा निवडून आणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हे एक आव्हान असताना राज्यात शिंदे गटाची ताकत वाढवणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.


शिंदे गटासाठी मिशन, मारक? : शिंदे गटाच्या आमदारांनी केलेली बंडखोरी ही सर्वसामान्य जनतेला रुचली आहे की नाही? हा अजून संशोधनाचा विषय असताना भाजपची २०२४ विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची वाटचाल व त्यात जागावाटपात शिंदे गटासाठी होणारा समझोता हा लाखमोलाचा विषय ठरणार आहे. त्यातच, "५० खोके एकदम ओके", ही वारंवार उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर होणारी जिव्हारी टीका ही शिंदे गटासाठी नाही म्हटली तरी चिंतेचा विषय आहे. यासर्व घडामोडीत खरी शिवसेना कोणती, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, कुठल्या गटाचा प्रतोद योग्य? यासर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असताना, भाजपने आतापासून सुरू केलेली मोर्चे बांधणी ही भाजपसाठी तारक करणार असून, ऐनवेळी शिंदे गटासाठी मारकही ठरू शकते.


शिंदे गटाची खरी परीक्षा : २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागांसह महाराष्ट्रात एकूण मतदानाच्या २५.७ टक्के मते भाजपला मिळाली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६४ जागा मिळाल्या होत्या व शिवसेनेच्या मतांची टक्केवारी १६.४ टक्के इतकी होती. विशेष म्हणजे संख्याबळात दुसऱ्या स्थानी असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीपेक्षा कमी मते मिळाली होती. राष्ट्रवादीची मतांची टक्केवारी १६.७ टक्के होती व त्यांचा ५४ जागी विजय झाला होता.

निवडणुकीत मते विभागल्याने मतांची टक्केवारी घसरणार : तर काँग्रेसने ४४ जागी विजय संपादन करीत त्यांना १५.८७ टक्के मतेच मिळवता आली होती. अशात आता उभ्या शिवसेनेत फूट पडल्याने २०१९ निवडणुकीत राज्यात १६.४ टक्के असलेली मतांची टक्केवारी वाढवण्याबरोबर शिंदे गटासोबत असलेल्या ५० आमदारांची जागा टिकवणे व त्यातही अधिकच्या जागा निवडून आणणे हे शिंदे गटासाठी आव्हान असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समझोत्यावरच सर्व अवलंबून असले तरी खरी परीक्षा शिंदे गटाची असणार आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.