After the revolt of Eknath Shinde : मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार -आमदार सुनील राऊत

author img

By

Published : Jun 28, 2022, 5:01 PM IST

Shiv Sena Bhavan

शिवसेनेतीलमंत्री ( ministers support Shinde ) आणि आमदार ( MLAs Support Shinde ) हे एकनाथ शिंदे ( After revolt of Eknath Shinde ) यांच्यासोबत बंडात सहभागी झाले आहेत. हे बंड झाल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असे मानले जात आहे. तरी शिवसेनेचे आमदार सुनील राऊत ( Shiv Sena MLA Sunil Raut ) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, तसे काहीही नाही कितीही लोक गेले तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. शिवसेना ही शिवसैनिकांच्या बळावर उभी ( Shiv Sena stands with Shiv Sainiks ) आहे. शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच ( Shiv Sainik stay with Shiv Sena ) मी मरेपर्यंत शिवसेनेतच असणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई : शिवसेनेतील मंत्री ( Chief eight ministers support Ekanath Shinde )आणि 29 आमदार ( Twenty-nine MLAs Support Shinde ) हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात ( After the revolt of Eknath Shinde ) सहभागी झाले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली असे मानले जात असले तरी आमदार सुनील राऊत ( Shiv Sena MLA Sunil Raut ) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, कितीही लोक गेले तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. शिवसेना ही शिवसैनिकांच्या बळावर उभी आहे. माझ्याबाबतीत म्हणाल तर मी आमच्या वडिलांपासून शिवसेनेत आहे आणि मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार.

शिवसेनेचे आमदारस सुनील राऊत

शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे : गेल्या तीन-चार दिवसांमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि नेते हे आमच्यासोबत असून, गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये मोठे मेळावे होत आहेत. या मेळाव्यांना हजारो शिवसैनिक हजेरी लावून आपण शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत याची ग्वाही देत आहेत. पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांवर तीव्र संताप आणि रोष सगळीकडे व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केवळ काही आमदार आणि नेते पक्षातून बाहेर गेले आहेत. त्यामुळे पक्ष फुटेल किंवा पक्षाला काही धोका आहे, असे मला वाटत नाही, असेही मनीषा कायंदे म्हणाल्या.

पाहूयात कोण कोण आहेत शिवसेनेसोबत :

शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेसोबत : शिवसेनेतील 55 पैकी 39 आमदार हे आता शिंदे गटासोबत आहेत. मात्र, पक्ष संघटनेचा विचार केला तर उद्धव ठाकरे हे अजूनही शिंदे गटावर वरचढ आहेत. शिवसेनेत महत्त्वाचे मानले जाणारे नेते हे पद आहे. या पदावर काम करणारे 12 नेते, तीस उपनेते, पाच सचिव आणि एक मुख्य प्रवक्ता तसेच दहा अन्य प्रवक्ते हे शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे आहेत. पक्षाचे अध्यक्ष पद हे सर्वोच्च पद असते हे पद उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम आहे. त्यानंतर महत्त्वाचे पद आहे ते म्हणजे नेता. हे पद या बारा नेते पदांपैकी एकनाथ शिंदे हे एक नेते वगळता उरलेले अकरा नेते अजूनही शिवसेनेसोबत आहेत ज्यांनी बंडखोरी केलेली नाही.

उद्धव ठाकरेंसोबत पक्षातील नेते : शिवसेनेमध्ये तीस उपनेते आहेत. यामध्ये बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील, आमदार तानाजी सावंत, यशवंत जाधव हे उपनेते वगळले तर उरलेले सर्व उपनेते उद्धव यांच्यासोबत काम करीत आहेत. पक्षामध्ये सचिव या महत्त्वाच्या पदावर पाच लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मिलिंद नार्वेकर खासदार विनायक राऊत आणि सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर यांचा समावेश आहे. हे सर्व पाचही जण उद्धव यांच्यासोबत उभे आहेत.

शिवसेनेचे सर्व खासदार अजूनही शिवसेनेत : शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे शिवसेनेसोबत कायम आहेत तर उरलेल्या दहा प्रमुख त्यांपैकी फक्त प्रताप सरनाईक हे बंडखोर गटात सहभागी झाले बाकीचे नऊ प्रवक्ते अजूनही शिवसेनेसोबत कायम आहेत. शिवसेनेचे 18 खासदार आहेत यापैकी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि खासदार भावना गवळी वगळता सर्व खासदार यांनी अजूनही आपली नाराजी व्यक्त केलेली नाही किंवा ते शिवसेनेच्या विरोधात गेलेले दिसत नाहीत

शिवसेनेच्या विविध उपसंघटना सोबत आहेत : युवा सेना ही शिवसेनेची प्रमुख उपसंघटना आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे तर सरचिटणीसपदावरून सरदेसाई आणि सूरज चव्हाण हे ठाकरे परिवाराची निगडित नेते असून ते शिवसेनेसोबत आहेत. शिवसेनेची महिला आघाडी सक्षम असून या महिला आघाडीत 18 प्रमुख पदे आहेत. यामध्ये विधान परिषदेचा उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आहेत. केवळ भावना गवळी आणि यामिनी जाधव वगळता बाकी सर्व शिवसेनेसोबत आहेत.

भारतीय कामगार सेना : कामगार आणि मजुरांसाठी काम करणारी भारतीय कामगार शिवसेना ही संघटना आहे या संघटनेच्या वतीने विमानतळ रेल्वे मेट्रो परिवहन विभाग बेस्ट या ठिकाणी काम केले जाते या संघटनेत आठ महत्त्वाचे पदाधिकारी आहेत जे सर्व उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती : मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेत दहा हजारांहून अधिक सदस्य आहेत केंद्र आणि राज्यातील सर्व मंत्रालयांशी आणि शासकीय खात्यांची संबंधित कर्मचारी कामगारांची संबंधित ही संघटना आहे या संघटनेची सूत्रे दोन खासदारांच्या हातात आहे जे दोघेही खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे आहेत.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis: रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करण्याचे दत्तात्रय भरणेंना निवेदन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.