Kolhapur Political Dispute : क्षीरसागर आणि इंगवलेमधील वाद विकोपाला ; इंगवले ठोकणार क्षीरसागरांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा

author img

By

Published : Sep 18, 2022, 10:47 AM IST

Ravikiran Ingwale

गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मिरवणूक स्वागत मंडपासमोर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलेल्या गद्दारीच्या घोषणेनंतर त्यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल (Dispute between Kshirsagar and Ingwale in Kolhapur ) झाला.या दोघांमधील वाद आता आणखीच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत ( Kshirsagar against Ingwale in Kolhapur ) आहे.

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मिरवणूक स्वागत मंडपासमोर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलेल्या गद्दारीच्या घोषणेनंतर त्यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल (Dispute between Kshirsagar and Ingwale in Kolhapur ) झाला. त्यानंतर क्षीरसागर यांनी आपल्याला ठार करण्याबाबत जाहीररीत्या धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी जुना राजवाडा पोलिसांत इंगवले यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे या दोघांमधील वाद आता आणखीच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत ( Kshirsagar against Ingwale in Kolhapur ) आहे.


गुवाहाटीमध्ये बसून धमकी दिली, आता इथे सुद्धा धमकी कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि रविकिरण इंगवले यांचा वाद हा आता शिगेला पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात गेलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या गटाकडून रविकिरण इंगवले यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा नोंद केल्यानंतर शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनीही थेट जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जात राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल केली ( Dispute between Kshirsagar and Ingwale ) आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली. यावेळी माजी आमदार राजेश क्षीरसागर ही शिंदे गटात जात थेट गुवाहाटीला पोहोचले. यावेळी कोल्हापुरात आक्रमक झालेले रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडले होते. यावेळी क्षीरसागर यांनी गुवाहाटीमध्ये बसून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुला सोडणार नाही, अशा पद्धतीचे धमकी दिली. तसेच दोन दिवसांपूर्वी बोलताना सुद्धा त्यांनी पुन्हा धमकी दिली, असे म्हणत रविकिरण इंगवले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.



खोटी फिर्याद दिल्याबद्दल अब्रू नुकसानीचा ठोकणार दावा इंगवले यांच्यासह 30 ते 40 जणांविरोधात क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर इंगवले यांनी आपल्या वकिलांना घेत सदर गुन्हा हा झालेलाच नसून याबाबतचे सर्व व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहेत. या व्हिडिओमध्ये मी कोठेही नव्हतो, असे म्हणत संबंधित फिर्यादी विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ( Abru damages claim )ठोकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ॲड. पाटील यांनी सुद्धा याबाबत माहिती ( Abru damages claim against Kshirsagars by Ingwale ) दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.