कोल्हापुरात अकबरुद्दीन ओवैसींचे स्वच्छतागृहात पोस्टर लावत भाजपचे आंदोलन
Updated on: May 14, 2022, 4:58 PM IST

कोल्हापुरात अकबरुद्दीन ओवैसींचे स्वच्छतागृहात पोस्टर लावत भाजपचे आंदोलन
Updated on: May 14, 2022, 4:58 PM IST
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी ( Akbaruddin Owaisi posters toilet Kolhapur ) यांनी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन फुले वाहून प्रार्थना केली होती. याप्रकरणी शिवसेना, भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून, आज कोल्हापुरात भाजपच्या राणे गटाकडून आझाद चौकात निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर - एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी ( Akbaruddin Owaisi posters toilet Kolhapur ) यांनी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन फुले वाहून प्रार्थना केली होती. याप्रकरणी शिवसेना, भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून, आज कोल्हापुरात भाजपच्या राणे गटाकडून आझाद चौकात निदर्शने करण्यात आली. शहरातील स्वच्छतागृहात अकबरुद्दीन ओवैसींचे पोस्टर लावत निषेध व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा - Kasturi Savekar : कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; कस्तुरी सावेकरने माउंट एव्हरेस्ट केले सर
संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वच्छतागृहात पोस्टर लावून त्यास जोड्यांनी मारले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ज्या औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून त्यांची हत्या केली होती, त्याच्या कबरीला अकबरुद्दीन ओवैसी यांनी फुल वाहिल्याने शिवसेना आणि भाजपसह हिंदुत्ववाद्यांकडून टीका होत असून या प्रकरणी आता विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापुरातील भारतीय जनता पार्टीचे व कट्टर राणे समर्थक सचिन तोडकर व त्यांच्या मित्रांनी आझाद चौकात एकत्र येत येथील स्वच्छतागृहावर अकबरुद्दीन ओवैसींचे पोस्टर लावत जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांकडून शहरातील विविध भागातील स्वच्छतागृहांवर पोस्टर लावून त्यास जोडे मारण्यात आले. आंदोलनावेळी पोलिसांनी तोडकरांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोस्टर काढले.
हेही वाचा - Native Cow Village Kolhapur : एक समाज एक गाव, देशी गायींचे गाव म्हणून लक्ष्मीवाडीची ओळख!
