A Shocking Incident in Amravati : नांदगाव खंडेश्वर येथील छोरियानगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ!

author img

By

Published : Jul 15, 2022, 3:57 PM IST

Updated : Jul 15, 2022, 5:04 PM IST

A Shocking Incident in Amravati

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अमरावती येथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील छोरियानगरमध्ये ( Chhoriyanagar in Nandgaon Khandeshwar ) राहणाऱ्या नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शहरातील छोरिया लेआउटच्या विहिरीमध्ये गढूळ पाणी जमा झाल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित ( Drinking Water is Contaminated ) झाले आहे. ( Shocking incident in Amravati )

अमरावती : अमरावती ( Shocking incident in Amravati ) येथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील छोरियानगरमध्ये ( Chhoriyanagar in Nandgaon Khandeshwar ) राहणाऱ्या नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शहरातील छोरिया लेआउटच्या विहिरीमध्ये गढूळ पाणी जमा झाल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा एकमेव असलेला स्रोत दूषित झाल्याने नाईलाजाने दूषित पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. ( Drinking Water is Contaminated )

स्थानिक नागरिक : छोरियानगरमध्ये अद्यापपर्यंत नगरपंचायतकडून होणाऱ्या पाणीपुरवठाची पाईपलाईन पोहचली नसल्याने येथील सर्व नागरिकांना या विहिरीवरून पाण्याचा पुरवठा होतो. या छोरियानगरमध्ये सांडपाणी किंवा पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता नाला नसल्यामुळे हे सर्व पाणी या विहिरीमध्ये गोळा झाले आहे. हे दूषित पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीकडे वारंवार नाल्यांची व पाणीपुरवठा पाइपलाइनची सुविधा पुरविण्याची मागणी करूनसुद्धा नगर पंचायतने या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

दूषित पाण्याचे जिल्ह्यात ४ बळी : दूषित पाणी पिल्यामुळे मेळघाटातील पाचडोंगरी आणि कोयलारी येथील ३ जणांचा तर नया अकोल्याचा २२ वर्षीय एका तरुणाचा अतिसाराची लागण झाल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच प्रशासनाने येथील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

नागरिकांमध्ये प्रचंड संताप : वारंवार मागणी करूनही नगरपंचायतने या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईप लाईन टाकली नाही. तसेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या ही बांधल्या नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दूषित पाणी पिल्याने येथील नागरिकांना जलजन्य किंवा अतिसाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Shiv Sena leader Sanjay Raut in Nagpur : हे सरकार हिंदुत्वद्रोही; खरे मुख्यमंत्री फडणवीसच-संजय राऊत

हेही वाचा : Devendra Fadnavis raj thackery meeting: अमित ठाकरेंची राजकारणात एंन्ट्री?; देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची "शिवतीर्थावर" भेट

हेही वाचा : Unique Marriage in Heavy Rain : नवरदेवाची पुरात कसरत... थर्माकोलच्या मदतीने 7 कि.मी. नदीमार्गाने जलप्रवास... अखेर पोहोचला नवरीकडे!

Last Updated :Jul 15, 2022, 5:04 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.