ऑगस्टमधील जीएसटी कर संकलनात गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांची वाढ

author img

By

Published : Sep 1, 2021, 7:01 PM IST

जीएसटी करसंकलन

नोव्हेंबर 2020 पासून करचुकवेगिरीविरोधात केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सलग नवव्या महिन्यात कर संकलनाचे प्रमाण हे 1 लाख कोटींहून अधिक आहे.

नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या वाईट स्थितीमधून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर पडत असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. ऑगस्टमध्ये वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे पुन्हा एकदा 1.1 लाख कोटींहून अधिक झाले आहे. हे कर संकलनाचे प्रमाण गतवर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत 30 टक्क्यांहून अधिक आहे.

ऑगस्टमध्ये देशांतर्ग व्यवहारामधून (आयातीच्या सेवांसह) मिळालेले उत्पन्न हे गतवर्षीच्या ऑगस्टमध्ये 27 टक्के अधिक आहे. ऑगस्ट 2021 मधील जीएसटी संकलन हे गतवर्षीच्या ऑगस्टमधील जीएसटी करसंकलाहून अधिक आहे. तर ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी संकलन हे 14 टक्के अधिक आहे.

हेही वाचा-मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांचा 'गंजाम पॅटर्न'; विजय कुलांगे यांची विशेष मुलाखत

ऑगस्टमधील जीएसटीचे असे राहिले प्रमाण-

  • ऑगस्टमध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी)- 1,12,020 कोटी रुपये
  • राज्य जीएसटी-26,605 कोटी रुपये
  • एकत्रित जीएसटी- 56,247 कोटी रुपये

आयजीएसटीमध्ये आयातीमधून मिळालेल्या 26,884 कोटी रुपयांच्या जीएसटीचाही समावेश आहे. तर 8,646 कोटी उपकराचाही समावेश आहे.

नोव्हेंबर 2020 पासून करचुकवेगिरीविरोधात केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सलग नवव्या महिन्यात कर संकलनाचे प्रमाण हे 1 लाख कोटींहून अधिक आहे. चालू वर्षात केवळ जून महिन्यात जीएसटी करसंकलन हे 1 लाख कोटींहून कमी झाले होते.

हेही वाचा-रोहतक हत्याकांड : एकुलत्या एक मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून; पोलिसांचा खुलासा

या कारणाने वाढले कर संकलन

जुलै 2021 ते ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी करसंकलन हे 1 लाख कोटीहून अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ही वेगाने सुधारत असल्याचे चिन्ह आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढल्याने आणि करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्याने कर संकलन वाढल्याचे सरकारने म्हटले आहे. येत्या काळातही जीएसटीचे करसंकलन वाढ होईल, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

हेही वाचा-ऑर्डर पॅक करायला उशीर झाल्याने डिलिव्हरी बॉयने हॉटेल मालकावर झाडली गोळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.