एका वर्षात तिसऱ्यांदा हिरो मोटोकॉर्पच्या किमतीत वाढ; पुढील आठवड्यापासून तीन हजाराने दुचाकी महागणार

author img

By

Published : Sep 16, 2021, 9:59 PM IST

हिरो मोटोकॉर्प

हिरो मोटोकॉर्प कंपनीने चालू वर्षात तिसऱ्यांदा वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. यापूर्वी कंपनीने जानेवारीत मोटरसायकल आणि स्कूटरची किंमत 1,500 रुपयापर्यंत वाढविली होती. तर एप्रिलपर्यंत वाहनाची किंमत 2,500 रुपयांनी वाढविली होती.

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीच्या सर्व वाहनांच्या किमती पुढील आठवड्यापासून 3 हजार रुपयांनी वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे.

हिरो मोटोकॉर्प वाहनांच्या किमती 20 सप्टेंबर 2021 पासून वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने वाहनांच्या किमती वाढविणे आवश्यक झाले आहे. कंपनीच्या सर्व मोटरसायकल आणि दुचाकींच्या किमती 3 हजार रुपयापर्यंत वाढणार आहेत. हे दरवाढीचे प्रमाण मॉडेल आणि बाजारावर अवलंबून असणार आहे.

हेही वाचा- बिहारमध्ये दोन मुले अचानक झाले अब्जाधीश; बँक खात्यात 960 कोटींहून अधिक रक्कम जमा

वर्षात तिसऱ्यांदा कंपनीकडून दुचाकींच्या किमतीत वाढ-

कंपनीने चालू वर्षात तिसऱ्यांदा वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. यापूर्वी कंपनीने जानेवारीत मोटरसायकल आणि स्कूटरची किंमत 1,500 रुपयापर्यंत वाढविली होती. तर एप्रिलपर्यंत वाहनाची किंमत 2,500 रुपयांनी वाढविली होती. हिरो मोटोकॉर्पकडून दुचाकी आणि स्कूटरची भारतीय बाजारपेठेत विक्री करण्यात येते. गेल्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत हिरो मोटोकॉर्पने 4,31,137 वाहनांची विक्री केली होती. हे प्रमाण गतवर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत 24 टक्क्यांनी कमी आहे.

हेही वाचा- राहुल गांधी हे इच्छाधारी हिंदू- मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांची खरमरीत टीका

दरम्यान, मारुती सुझुकीनेही चालू वर्षात तीनवेळा वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत.

हेही वाचा-कधी येत आहे यंदाचा पितृपक्ष ? या तारखेला करा श्राध्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.