व्हॉट्सअपचा वापरकर्त्यांना दणका, 30 लाख अकाउंट बंद, या मोबाईलवर चालणार नाही व्हॉट्सअप

author img

By

Published : Sep 1, 2021, 3:58 PM IST

Updated : Sep 6, 2021, 2:43 PM IST

whatsapp ban

व्हॉट्सअपकडून जगभरात दर महिन्याला नियमभंग करणारी 80 लाख अकाउंट बंद केली जातात. भारतातही कंपनीने अशीच कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - नियमभंग करणाऱ्या व्हॉट्सअप अकाउंटवर कंपनीने मोठी कारवाई केली आहे. व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकच्या माहितीनुसार 16 जून ते 31 जुलैदरम्यान 30 लाख 27 हजार व्हॉट्सअपची अकाउंट बंद करण्यात आली आहेत. तर 594 वापरकर्त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, आता येत्या 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅप 43 स्मार्टफोन मॉडेल्सवर चालणार नाही.

व्हॉट्सअपकडून प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता, डाटा सायन्स आदी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून 16 जून ते 31 जुलैदरम्यान 30 लाख 27 हजार व्हॉट्सअपची अकाउंट बंद करण्यात आली आहेत. तर 594 वापरकर्त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

हेही वाचा-'पंच प्यारे' विधानावरून हरीश रावत वादाच्या भोवऱ्यात; वाचा काय प्रकरण...

व्हॉट्सअपकडून जगभरात दर महिन्याला 80 लाख अकाउंट बंद

यापूर्वी बेकायदेशीरपणे बल्क मेसेज पाठविण्यात येणाऱ्या 95 टक्के व्हाट्सअप अकाउंटवर कंपनीने कारवाई केली होती. +91 या क्रमांकावरून व्हॉट्सअपची खाती भारतीय वापरकर्त्यांची असल्याची माहिती कंपनीला कळते. व्हॉट्सअपकडून जगभरात दर महिन्याला नियम भंग करणारी 80 लाख अकाउंट बंद केली जातात.

हेही वाचा-Marital Rape : पत्नीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार नाही का? कायदा काय सांगतो...

नवीन आयटी कायदा 2021 नुसार व्हॉट्सअपने दुसरा मासिक अहवाल हा जाहीर केला आहे. त्यामध्ये 16 जून ते 31 जुलैपर्यंत वापरकर्त्यांच्या आलेल्या तक्रारी व कंपनीकडून वापरकर्त्यांच्या अकाउंटवर केलेली कारवाई इत्यादी माहिती दिली.

काय आहे सोशल मीडिया नियमावली?

  • सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी भारतात एक तक्रार निवारण व्यासपीठ करावं आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तक्रार 24 तासांत नोंद करावी आणि 15 दिवसांत तिचे निवारण करावे. संबंधित व्यासपीठ 24 तास सुरू असावे.
  • प्रत्येक महिन्याला किती तक्रारी आल्या आणि किती तक्रारींवर कारवाई करण्यात आली, यासंदर्भातील एक अहवाल जमा करावा.
  • एखाद्या युजरचे कंटेट हटवण्यात आले. तर यावेळी संबंधित युजरलाही आपली बाजू मांडण्याचा अधिकार द्यावा.
  • एखादी पोस्ट सर्वांत पहिल्यांदा कोणी पोस्ट केली. म्हणजेच कंटेटचा फर्स्ट ओरिजिनेटर कोण आहे, याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सरकारला माहिती द्यावी. उदाहरणार्थ, देशाच्या अंखडतेविरोधात पसरवण्यात आलेल्या पोस्ट, ज्यात पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
  • या फोनवर व्हॉट्सअॅप चालेल -

    • अँड्रॉइड ओएस 4.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स
    • iOS 10 आणि त्यानंतरचे आयफोन्स
    • काही निवडक KaiOS 2.5.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स, ज्यात JioPhone आणि JioPhone 2 चा समावेश आहे

    व्हॉट्सअ‍ॅप या स्मार्टफोनला सपोर्ट करणार नाही -

    १ नोव्हेंबरपासून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मच्या काही जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही.

    अॅपल

    आयफोनच्या एसई, 6s आणि 6s प्लसवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

    सॅमसंग

    सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, गॅलेक्सी ट्रेंड II, गॅलेक्सी एस 2, गॅलेक्सी एस 3 मिनी, गॅलेक्सी एक्सकव्हर 2, गॅलेक्सी कोर आणि गॅलेक्सी एस 2वरही व्हॉट्सअ‍ॅप काम करणं बंद करेल.

    सोनी

    सोनी एक्सपीरिया मायरो, सोनी एक्सपीरिया नियो एल आणि सोनी एक्सपीरिया आर्क एस.

    हुआवेई

    हुआवेई असेंड जी740, असेंड मेट, हुआवेई असेंड डी क्वॉड एक्सएल, असेंड पी1 एस आणि असेंड डी2.

    जेडटीई

    जेडटीई ग्रँड एस फ्लेक्स, जेडटीई व्ही956, ग्रँड एक्स क्वॉड व्ही986, ग्रँड मेमो.

    इतर

    अल्काटेल वन टच इव्हो 7 हँड-ऑन, अर्कोस 53 प्लॅटिनम, एचटीसी Desire 500, Caterpillar कॅट बी 15, विको सिंक फाइव्ह, विको डार्कनाइट, लेनोवो ए820, यूएमआय एक्स 2, Faea एफ 1 आणि टीएचएल डब्ल्यू 8.

Last Updated :Sep 6, 2021, 2:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.