WhatsApp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप एकावेळी 'इतक्या' लोकांसाठी ग्रुप व्हिडिओ आणि कॉल लिंकची देणार सेवा

author img

By

Published : Sep 27, 2022, 5:29 PM IST

WHATSAPP

व्हॉट्सअ‍ॅप अपडेटमध्ये ( Whatsapp update ) सोशल ऑडिओ लेआउट, स्पीकर हायलाइट्स आणि वेव्हफॉर्मसह पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस समाविष्ट आहे. जुलैमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन वैशिष्ट्य ( WhatsApp new feature ) आणले आहे. ज्यामध्ये वापरकर्ते ग्रुप व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल सुरू केल्यानंतरही सामील होऊ शकतात. मेटाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व्हिडिओ कॉल्स सुरू करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने ( Meta CEO Mark Zuckerberg ) सोमवारी जाहीर केले की व्हॉट्सअ‍ॅप कॉल लिंक्स ( WhatsApp Call links ) जारी करत आहे. ज्यामुळे आता फक्त एका टॅपने कॉलमध्ये सामील होता येणार आहे. मार्क झुकेरबर्गने पोस्ट म्हंटले की, "आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर 32 लोकांपर्यंत सुरक्षित आणि एनक्रिप्टेड ग्रुप व्हिडिओ कॉलची चाचणी सुरू केली आहे ( Whatsapp video calls up to 32 people )." व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कॉलिंगमध्ये ( WhatsApp Group calling ) आतापर्यंत आठ सहभागींना एकमेकांशी व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी दिली जात होती.

वापरकर्ते कॉल टॅबमधील 'कॉल लिंक' ( Call Link ) पर्यायावर टॅप करू शकतात आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलसाठी एक लिंक तयार करू शकतात. त्याचबरोबर कुटुंब आणि मित्रांसह सहजपणे शेअर करू शकतात. या आठवड्यात रिलीझ सुरू होत असताना कॉल लिंक वापरण्यासाठी लोकांना अ‍ॅपच्या नवीनतम आवृत्तीची ( WhatsApp latest version ) आवश्यकता असेल. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी, मेटा-मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएप ( Messaging platform WhatsApp ) लवकरच ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये 32 सहभागींना समर्थन देईल, असे अहवाल एप्रिलमध्ये समोर आले होते.

व्हॉट्सअ‍ॅप नवीन अपडेटमध्ये ( Whatsapp new update ) सोशल ऑडिओ लेआउट ( Social audio layout 0, स्पीकर हायलाइट्स आणि वेव्हफॉर्मसह पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस समाविष्ट आहे. जुलैमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन वैशिष्ट्य ( WhatsApp new feature )आणले आहे. ज्यामध्ये वापरकर्ते ग्रुप व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल सुरू केल्यानंतरही सामील होऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ कॉल स्क्रीनमध्ये सहभागींना जसे तुम्ही विविध संप्रेषण अॅप्सवर पाहता तसे पाहू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की 'जॉइन करण्यायोग्य कॉल्स' ( WhatsApp Joinable Calls ) ग्रुप कॉल सुरू केल्यावर उत्तर देण्याचे ओझे कमी करते. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कॉलिंगमुळे वैयक्तिक संभाषणांमध्ये सहजता आणि सुलभता आणते. फोन वाजल्यावर तुमच्या गटातील एखाद्याचा कॉल चुकला, तरीही ते त्यांना हवे तेव्हा सामील होऊ शकतात. जोपर्यंत कॉल चालू आहे तोपर्यंत, तुम्ही ड्रॉप-ऑफ आणि पुन्हा सामील होऊ शकता. भारतातील 400 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांसाठी, प्रियजनांशी आणि विशेषत: सामाजिक अंतराच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल्स हा एक सोपा मार्ग आहे.

हेही वाचा - NASA Dart Mission: पृथ्वीला वाचवण्याचा प्रयोग यशस्वी.. नासाचे अंतराळयान धडकले लघुग्रहाला.. अन् झालं 'असं'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.