Satellite Debris : गुजरातमधील आणंदजवळ पडले उपग्रहाचे तुकडे

author img

By

Published : May 13, 2022, 3:05 PM IST

Satellite Debris

आनंद जिल्ह्यातील भालेजजवळील दागजीपुरा खानकुवा जितपुरा या तीन गावातील ( Dagjipura Khankuva Jitpura ) रहिवाशांनी दुपारी ४ च्या जोराचा आवाज ऐकला. आणि काहीतरी वस्तू पडल्याचे त्यांना आढळून आले. उपग्रहाचे तुकडे पडले असल्याचा कयास बांधला जात आहे. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

आणंद : आनंद जिल्ह्यातील भालेजजवळील दागजीपुरा खानकुवा जितपुरा या तीन गावातील ( Dagjipura Khankuva Jitpura ) रहिवाशांनी दुपारी ४ च्या जोराचा आवाज ऐकला. आणि काहीतरी वस्तू पडल्याचे त्यांना आढळून आले. उपग्रहाचे तुकडे पडले असल्याचा कयास बांधला जात आहे. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Satellite Debris
स्पेस ऑबजेक्टने दिली धडक

काय घडले दुपारी -

स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी आनंद जिल्ह्यातील जितपुरा दागजीपुरा आणि खानकुवा गावात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. तेथे काल एक स्फोट झाला. आणि तेथे उपग्रहाच्या ढिगाऱ्याचे काही तुकडे तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचा हा जळलेला तुकडा असू शकतो ज्यामुळे हा परिसरात क्रॅश झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस वक्तव्य करण्यात आलेले नाही.

Satellite Debris
आणंदजवळ पडले उपग्रहाचे तुकडे

घटनास्थळी पोहोचले पोलीस

या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने भालेज पोलीस विभागाला दिली. कर्मचाऱ्यांचा एक गट घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी एफएसएल पथकाला सतर्क केले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. जर या विषयावर खगोलशास्त्रज्ञांचा एक गट संभाव्य चौकशीच्या शक्यतांवर चर्चा करत आहे.

हेही वाचा - Rahul Bhat killing: काश्मीर खोऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी काश्मिरी पंडितांची निदर्शने.. राहुल भटच्या हत्येचा निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.