Weather Forecast India: देशभरात अवकाळी पावसाचे संकेत.. महाराष्ट्रातही 'या' दिवशी पाऊस.. शेतकऱ्यांपुढे संकट..

author img

By

Published : Jan 22, 2023, 1:18 PM IST

weather-forecast-india-signs-of-unseasonal-rain-across-the-country-rain-on-this-day-in-maharashtra

आगामी काही दिवसात देशभरात अवकाळी पावसाचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात येत आहेत. दरम्यान देशाच्या काही भागांमध्ये आज रिमझिम पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही आगामी काही दिवसात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश): मध्यप्रदेशची राजधानी भोपाळसह मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये आज दात धुके दिसून आले आहे. तर मध्यप्रदेशच्या पूर्वेकडील रीवा आणि सतना जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाची नोंद झाली, असे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 26 जानेवारीपासून पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 26 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत राज्यातील नासिक, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मंगळवारी, बुधवारी हलक्या सरींची अपेक्षा: भारताच्या उत्तरेकडील भागांवरील पश्चिमी विक्षोभामुळे, नैऋत्य-पश्चिम राजस्थानवर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ज्यामुळे दक्षिण-पूर्वेकडून आणि काही वेळा दक्षिणेकडून वारे वाहत होते, असे IMD च्या भोपाळ कार्यालयाचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एचएस पांडे यांनी एजन्सीला सांगितले. यामुळे मध्यप्रदेशातील काही भागात ढगाळ हवामान झाले आहे, ज्यामुळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे आणि पुढील सुमारे एक आठवडा असेच हवामान राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. IMD नुसार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी हलक्या सरींची अपेक्षा आहे.

मध्यप्रदेशात पडला पाऊस: आज भोपाळ, दमोह आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये 500 ते 1,000 मीटरपर्यंत दृश्यमानता होती, असे ते म्हणाले. पूर्व मध्यप्रदेशातील सतना आणि रीवा येथे गेल्या 24 तासांत अनुक्रमे 1.8 मिमी आणि सुमारे 1 मिमी हलक्या पावसाची नोंद झाली, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. मध्य प्रदेशातील दतिया येथे ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. ग्वाल्हेर वगळता राज्याच्या इतर भागात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर राहिल्याने लोकांना थंडीच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला, असे ते म्हणाले.

उत्तराखंडमध्ये थंडीची लाट: सुरु आहे. डोंगरापासून मैदानापर्यंत थंडीची लाट पसरली आहे. हिमालयाच्या उंच भागात बर्फवृष्टी होत असल्याने थंडी वाढली आहे. अनेक भागात पाऊसही पडत असून थंडीपासून वाचण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेत आहेत. डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाल्यानंतर लोक घरात राहणे पसंत करत असून, बाजारपेठेत शांतता आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे जोशीमठमधील बेघर लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकांना आपल्या कुटुंबासह मदत छावण्यांमध्ये राहावे लागत आहे आणि या कडाक्याच्या थंडीत ते जगत आहेत.

उत्तराखंडमध्ये हवामान बदलू शकते: त्याच वेळी, हवामान खात्याने आज राज्याच्या उत्तरकाशी, चमोली आणि पिथौरागढच्या उच्च उंचीच्या भागात हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. तापमानाबाबत बोलायचे झाले तर आज राज्यात कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ७ अंश सेल्सिअस राहील. आज मसुरीमध्ये किमान तापमान -3 अंश सेल्सिअस आणि कमाल 7 अंश सेल्सिअस राहील, नैनितालमध्ये किमान तापमान 1 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 10 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.

दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता: उत्तर भारतातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत तापमानात किंचित सुधारणा झाली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दिल्लीतील तापमानातच सुधारणा झाली नाही तर दृश्यमानतेतही किंचित सुधारणा झाली आहे. आज सकाळी दिल्लीतील सफदरजंग, पालम आणि लोधी रोडमध्ये 500 मीटरपेक्षा जास्त दृश्यमानता नोंदवण्यात आली आहे.

पंजाब, हरियाणात दृश्यमानता सुधारली: अमृतसर, लुधियाना, जालंधर, चंदीगड, अंबाला, कर्नाल, सोनीपत आणि पानिपत ही काही ठिकाणे होती जिथे हवामान खात्याने 0 ते 500 मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदवली होती. मागील दिवसांपेक्षा ते खूप चांगले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीच्या आत तापमानात सुधारणा होत राहील. तथापि, 23 ते 25 जानेवारी दरम्यान दिल्लीतील विविध भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे उत्तर भारतातील डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स असल्याचे सांगितले जाते.

राजस्थानात थंडीचा कडाका कायम: उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा परिणाम आता राजस्थानातही दिसून येत आहे. बर्फाळ वाऱ्यांमुळे माउंट अबूमध्ये थंडी वाढली आहे. रविवारी येथील किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसची घट नोंदवण्यात आली. त्यानंतर माउंट अबूचे किमान तापमान उणे ३ अंशांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर पारा घसरल्याने येथील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर थेट परिणाम झाला आहे. तसेच, सकाळी मोटारींच्या छतावर आणि झाडांवर बर्फाचा हलका थर दिसत होता.

हेही वाचा: Today weather Forecast हवामानशास्त्र विभागाचा अंदाज या राज्यांमध्ये पडणार कडाक्याची थंडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.