Video Ruthlessness of Ambulance driver : रुग्णवाहिकेची दुचाकींना धडक, अपघातामधील जखमींशी निर्दयी वागून चालकाचा पळ

author img

By

Published : May 14, 2022, 7:16 PM IST

अपघातामधील जखमींशी निर्दयी वागून चालकाचा पळ

गेल्या महिन्यात १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ( Akbarpur accident viral video ) अकबरपूर ओव्हर ब्रिजजवळ एका रुग्णवाहिकेला धडकल्याने तीन दुचाकीस्वार गंभीर ( Ambulance two wheeler accident ) जखमी झाले होते. तिघे तरुण अकबरपूर मेहरोत्रा ​​पेट्रोल पंपाजवळ ( Akbarpur Mehrotra pump accident ) पोहोचले. त्यावेळी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने त्यांना धडक दिली.

आंबेडकर नगर ( लखनौ ) - उत्तर प्रदेशात आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचाऱ्यांचे निर्दयी आणि अमानुष कृत्य दाखविणारा ( video showing the ruthlessness ) व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्‍हाला धक्का बसेल. लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अपघातामधील जखमींना निर्दयी वागणूक दिली. अपघाताचे सीसीटीव्ही ( CCTV of the Ambedkar nagar accident ) फुटेज समोर आल्यानंतर रुग्णवाहिका कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाची असंवेदनशीलता समोर आली आहे.

हे आहे संपूर्ण प्रकरण- गेल्या महिन्यात १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ( Akbarpur accident viral vide0 ) अकबरपूर ओव्हर ब्रिजजवळ एका रुग्णवाहिकेला धडकल्याने तीन दुचाकीस्वार गंभीर ( Ambulance two wheeler accident ) जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्थानिक लोकांची मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हसिमपूर बसगवा येथील रहिवाशी मोहम्मद अल्ताफ मुलगा इस्रास हे त्याचे मित्र मोहम्मद कॅप मुलगा मेहदी आणि मोहम्मद नसीफ यांच्यासोबत एकाच दुचाकीवरून परीक्षा देण्यासाठी जात होते. हे तिघे तरुण अकबरपूर मेहरोत्रा ​​पेट्रोल पंपाजवळ ( Akbarpur Mehrotra pump accident ) पोहोचले. त्यावेळी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने त्यांना धडक दिली. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. मात्र या जखमी तरुणांना मदत करण्याऐवजी रुग्णवाहिका चालक निघून गेला. त्याचवेळी पोलीस प्रशासनानेही या घटनेवर मौन बाळगले.

अपघातामधील जखमींशी निर्दयी वागून चालकाचा पळ

व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ - 13 एप्रिल रोजी झालेल्या या रस्ता अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कारने 108 रुग्णवाहिकेखाली पडलेल्या जखमींना काही अंतरापर्यंत ओढत नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून चालक बाहेर आला. त्याने रुग्णवाहिकेखाली सापडलेल्या विद्यार्थ्याला ओढत बाहेर काढले. अपघातादरम्यान अनेक पोलीसही तेथून निघून गेले. मात्र त्यांना कोणीही मदत केली नाही. अखेर स्थानिकांच्या मदतीने जखमी तरुणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सीओ सिटीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-Terrible fire in Amritsar : अमृतसरमधील गुरुनानक रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरू

हेही वाचा-Tripura CM resigns : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा राजीनामा; 'ही' आहे भाजपची व्युहनीती

हेही वाचा-Asaduddin Owaisi on Muslim Vote Bank : भारतात कधीही मुस्लिम व्होट बँक नव्हती, ती कधीच असणार नाही - असदुद्दीन ओवेसी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.