Twitters Action On Child Porn : चाइल्ड पॉर्नवर ट्विटरची मोठी कारवाई, 57 हजारांहून अधिक खाती केली बॅन

author img

By

Published : Oct 3, 2022, 11:12 AM IST

TWITTERS

ट्विटरने चाइल्ड पोर्नोग्राफीवर मोठी कारवाई ( Twitters Action On Child Porn ) केली आहे. तसेच ट्विटरने देशातील 57,643 खात्यांवर बंदी ( 57643 Twitter Accounts Ban in India ) घातली आहे.

नवी दिल्ली: भारतातील आपल्या प्लॅटफॉर्मवर चाइल्ड पोर्नोग्राफीच्या प्रसारामुळे मोठ्या वादाला तोंड देत असलेल्या ट्विटरने मोठी कारवाई केली ( Twitters Action On Child Porn ) आहे. ट्विटरने 26 जुलै ते 25 ऑगस्ट दरम्यान देशातील 57,643 खात्यांवर बंदी घातली ( 57643 Twitter Accounts Ban in India ) आहे. देशात लहान मुलांचे लैंगिक शोषण, असहमती नग्नता आणि संबंधित कंटेट जाहिरातीविरोधात हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ( Delhi Commission for Women Chairperson Swati Maliwal ) यांनी म्हटले होते की, चाइल्ड पोर्नोग्राफीच्या तक्रारींवर ट्विटरवरून मिळालेले प्रतिसाद अपूर्ण आहेत. त्यामुळे आयोग त्यांच्यावर समाधानी नाही. मालीवाल यांनी 20 सप्टेंबर रोजी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर चाइल्ड पोर्नोग्राफी ( Child pornography on microblogging platforms ) आणि महिला आणि मुलांवरील बलात्काराचे व्हिडिओ दर्शविणाऱ्या ट्वीट्सवर ट्विटर इंडिया पॉलिसी हेड आणि दिल्ली पोलिसांना समन्स बजावले होते.

लहान मुलांशी संबंधित लैंगिक कृत्यांचे खुलेआम व्हिडिओ आणि चित्रे दाखविणाऱ्या अनेक ट्विटची स्वत:हून दखल घेत आयोगाने म्हटले आहे की, बहुतांश ट्विटमध्ये मुलांना पूर्णपणे नग्न दाखवण्यात ( Completely nude video in tweets ) आले आहे. तसेच त्यातील अनेकांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. क्रूर बलात्कार आणि इतर गैर-सहमतीने लैंगिक अत्याचारांसह क्रियाकलाप देखील चित्रित केले आहेत.

ट्विटरने नवीन IT नियम 2021 चे पालन करण्याबाबतच्या मासिक अहवालात असेही म्हटले आहे की, त्यांना भारतातील वापरकर्त्यांकडून तक्रार निवारण यंत्रणेद्वारे एकाच वेळेत 1,088 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींवर कारवाई करत कंपनीने 41 URL वर कारवाई केली. याव्यतिरिक्त, ट्विटर खाते निलंबनासाठी आवाहन करणाऱ्या 76 तक्रारी पाहिल्या.

ट्विटरने म्हटले आहे की परिस्थितीच्या तपशीलांचे पुनरावलोकन केल्यानंतर, आम्ही यापैकी कोणत्याही खात्याचे निलंबन मागे घेतलेले नाही. या अहवाल कालावधी दरम्यान, ट्विटरला खात्यांबद्दल सामान्य प्रश्नांशी संबंधित 15 विनंत्या देखील प्राप्त झाल्या. कंपनीने म्हटले आहे की ते बाल लैंगिक शोषणाला ( Child sexual abuse ) प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही सामग्रीचा प्रचार करत नाही. मग ते डायरेक्ट मेसेजिंगमध्ये असो किंवा संपूर्ण सेवेमध्ये इतरत्र असो.

भारतात, वापरकर्त्यांनी ऑनलाइन गैरवर्तन आणि छळ ( Online abuse and harassment ) (544) आणि द्वेषपूर्ण वर्तन (502) बद्दल इतर श्रेणींमध्ये सर्वाधिक नोंदवले. दरम्यान, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी या आठवड्यात ट्विटरवर बाल पोर्नोग्राफीची विनंती करणारे ट्वीट्सच्या उपस्थितीबद्दलच्या अहवालांवर गंभीर चिंता व्यक्त केली.

हेही वाचा - End of Mangalyaan Mission मंगलयानचा अखेरचा टप्पा पूर्ण, उपग्रहाचा तुटला संपर्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.