Tomato Fever In Kerala : केरळमध्ये टोमॅटो तापाची साथ.. मोठ्या संख्येने रुग्णांची नोंद

author img

By

Published : May 12, 2022, 1:33 PM IST

Tomato fever cases reported in Kerala

केरळमधील लहान मुलांमध्ये टोमॅटो तापाची साथ आली आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टोमॅटो तापाची लागण होत असून, आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. केरळमध्ये टोमॅटो तापाच्या अनेक रुग्णांची नोंद करण्यात आली ( Tomato fever cases reported in Kerala ) आहे.

तिरुअनंतपुरम: केरळमधील मुलांमध्ये टोमॅटो तापाची लागण होत आहे. कोल्लम जिल्ह्यातील आर्यनकावू, आंचल आणि नेदुवाथूर सारख्या भागात अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि आरोग्य विभागाने राज्यभर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या ८२ रुग्णांची नोंद झाली असून, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णांची संख्या वाढू ( Tomato fever cases reported in Kerala ) शकते. टोमॅटो ताप हा 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा ताप संसर्गजन्य आहे. आरोग्य विभागाने सर्वाधिक प्रकरणे आढळलेल्या जिल्ह्यांतील अंगणवाड्या बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

टोमॅटो ताप म्हणजे काय? ( What Is Tomato Fever ) : टोमॅटो ताप 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. क्वचितच तो प्रौढांमध्येही दिसून येतो. या आजाराचे कारण अद्याप कळलेले नाही. बाधित रुग्णांच्या त्वचेवर लाल पुरळ उठतात आणि या त्वचेच्या पुरळांमुळे त्याला टोमॅटो ताप असे नाव पडले. रुग्णांना तोंड आणि घशात फोड येणे, शरीरात तीव्र वेदना, निर्जलीकरण, थकवा आणि तळवे आणि पाय यांचा रंग बदलणे देखील दिसून येईल. या आजाराच्या व्यवस्थापनात वेळेवर निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. निर्जलीकरणामुळे, मुलांमध्ये गुंतागुंत होऊ शकते आणि त्यामुळे वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे.

अधिकाऱ्यांच्या बैठका : या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. तिरुअनंतपुरम येथे आरोग्य अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती आणि पुढील मान्सून हंगामासाठी राज्य स्वत: ला तयार करत आहे. त्यानुसार सर्व संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत.

हेही वाचा : Dogs Virus Infected Amravati : श्वानप्रेमींची चिंता वाढली; 'या' संसर्गजन्य आजाराने ५०% श्वान बाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.