Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: आज छत्रपती संभाजी महाराज जयंती, जाणून घेवू या त्यांच्या कार्याविषयी

author img

By

Published : May 14, 2023, 8:38 AM IST

Today Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती यांची जयंती आहे. ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. 40 दिवस यातना भोगूनही त्यांनी धर्म सोडला नाही.

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर महान सेनानी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला. छत्रपती संंभाजी महाराज हे दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आजी म्हणजे जिजाबाई यांनी त्यांचे संगोपन केले. दरवर्षी 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत राज्य केले. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते.

एक कुशल लेखक : छत्रपती संभाजी महाराजांचा जिवुबाईशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीचे नाव येसूबाई हे नाव ठेवले. संभाजी महाराजांनी तत्कालीन पराक्रमी मुघल आणि इतर शत्रूंविरुद्ध 120 लढाया केल्या. संभाजी महाराज हे केवळ योद्धाच नव्हते, तर एक कुशल लेखकही होते. अवघ्या 14 वर्षांचे असताना त्यांनी 'भुदभूषण'चे तीन खंड लिहिले. हे पुस्तक राज्यकलेच्या विविध पैलूंशी संबंधित आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे शासन : छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजींना गादीवर येण्यात खूप अडचणी आल्या, कारण त्यांच्या विरोधात अनेकांनी कट रचला. मराठा राज्य आणि मुघल साम्राज्य तसेच गोव्यातील सिद्दी, म्हैसूर आणि पोर्तुगीज यांसारख्या इतर शेजारील सत्ता यांच्यात सुरू असलेल्या युद्धांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचे शासन मोठ्या प्रमाणात आकाराला आले. 1689 मध्ये, छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडले. त्यांचा छळ केला. त्यांना मृत्युदंड दिला. त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ राजाराम हे गादीवर बसले.

  1. हेही वाचा : Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी
  2. हेही वाचा : Vicky Kaushal as Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीत बनणार भव्य चित्रपट, विकी कौशल साकारणार राजेंची भूमिका
  3. हेही वाचा : MLA Shivendra Raje : छत्रपती संभाजी महाराजांची धर्मरक्षक म्हणून इतिहासात ओळख, आमदार शिवेंद्रराजे यांचा दावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.