Rajasthan Road Accident : भाविकांच्या बसला ट्रेलरची भीषण धडक, अपघातात 12 भाविक ठार तर 11 जण जखमी

Rajasthan Road Accident : भाविकांच्या बसला ट्रेलरची भीषण धडक, अपघातात 12 भाविक ठार तर 11 जण जखमी
Rajasthan Road Accident : गुजरातमधील भावनगरमधून मथुरेला जाणाऱ्या भाविकांच्या बसला ट्रेलरनं जोरदार धडक दिली. या अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला. तर तब्बल 12 जण जखमी झाल्याची माहिती भरतपूरचे जिल्हाधिकारी मृदुल कच्छावा यांनी दिली.
जयपूर : (राजस्थान) भावनगर इथून मथुरेला जाणाऱ्या भाविकांच्या बसला ट्रेलरनं भीषण धडक दिल्यानं तब्बल 12 भाविकांचा मृत्यू झाला. तर 11 भाविक जखमी झाले. ही घटना जयपूर आग्रा महामार्गावरील भरतपूर जिल्ह्यातील हांथरा इथं घडली. या जखमी भाविकांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या घटनास्थळावर बचावकार्य सुरु असल्याची माहिती भरतपूरचे जिल्हाधिकारी मृदुल कच्छावा यांनी दिली आहे.
भावनगरवरुन मथुरेला जात होते भाविक : गुजरातमधील भावनगर येथील भाविक उत्तर प्रदेशातील मथुरेला बसनं जात होते. यावेळी जयपूर आग्रा महामार्गावरील भरतपूर जिल्ह्यातील हांतराजवळ ट्रेलर आणि बसची भीषण धडक झाली. या धडकेत तब्बल 12 भाविकांचा मृत्यू झाला असून 11 भाविक जखमी असल्याची माहिती भरतपूरचे जिल्हाधिकारी मृदुल कच्छावा यांनी दिली. घटनास्थळावर बचावकार्य सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
11 जणांचा मृत्यू : ही बस भावनगरहून मथुरामार्गे हरिद्वारला जात होती. घटनेनंतर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ही बस भरतपूर येथील भावनगरहून मथुरामार्गे हरिद्वारला जात असताना भरतपूर-आग्रा महामार्गावर सकाळी अचानक बसचा डिझेल पाइप फुटला. यानंतर 10 ते 12 जण चालकासह बसमधून खाली उतरले. तेव्हा दुसऱ्या बाजूनं भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिली. त्यानंतर तात्काळ मदत, बचाव कार्य सुरु करण्यात आलं. रस्त्यावर पडलेल्या तसंच जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झालाय. सर्व मृतदेह भरतपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
रस्त्यावर मृतदेहांचा ढीग : महामार्गावर पडलेले मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या अपघातामुळं महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जाईल असं पोलिसांनी सांगितलंय. या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.
हेही वाचा :
