Rs 2000 Exchange : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र नाही? काळजी करु नका, ही बातमी वाचा

author img

By

Published : May 21, 2023, 4:02 PM IST

Updated : May 21, 2023, 5:53 PM IST

Etv Bharat

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला होता. दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून मिळण्याची 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. मात्र, त्यासाठी ओळखपत्राची गरज असल्याची चर्चा होती. एसबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही ओळखपत्राची गरज नसल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा बदलून घेण्यासाठी कोणतेही ओळखपत्र सबमिट करण्याची किंवा कोणताही अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. ग्राहकांना एका वेळी दोन हजार रुपयांच्या जास्तीत जास्त दहा चलनी नोटा म्हणजेच 20 हजार रुपये बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नोटा बदलीसाठी ओळखपत्र गरजेचे नाही - ग्राहकांच्या ओळख पुराव्याच्या तपशीलासाठी समर्पित स्तंभ असलेली मागणी स्लिप एसबीआयकडून मागे घेण्यात आली आहे. ग्राहकांना योग्यरित्या नोटा बदलून देण्यासाठी व्यवस्था करा. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे आदेश एसबीआयने सर्व शाखांना दिले आहेत. त्यामुळे आता तुम्ही जर एसबीआय बँकेचे ग्राहक असाल तर ओखळपत्राशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.

30 सप्टेंबर शेवटची तारीख - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी दोन हजार रुपयांच्या चलनातील नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व नोटा येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जाऊन बदलून घेण्याची विनंतीही आरबीआयने आपल्या निवेदनातून ग्राहकांना केली होती. तसेच एकावेळी दोन हजार रुपयांच्या 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपये एकावेळी बदलून मिळणार आहेत.

  • SBI clarifies that the facility of exchange of Rs 2000 denomination bank notes upto a limit of Rs 20,000 at a time will be allowed without obtaining any requisition slip pic.twitter.com/TP6t2n9oeJ

    — ANI (@ANI) May 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ग्राहकांच्या मनात भीती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये नोटबंदी करून सर्वांनाच धक्का दिला होता. त्यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर आता आरबीआयने परिपत्रक काढून दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आताही या नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने तारीख दिली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे.

नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया -

  • आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा करताच लोकांच्या मनात २०१६ च्या नोटाबंदीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आता या 2000 रुपयांच्या नोटांचे काय होणार, त्या कशा बदलायच्या, एकावेळी किती नोटा बदलता येतील, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहेत. तर इथे नोट बदलण्याच्या प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक प्रश्न सोप्या शब्दात समजून घ्या.
  • तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन 2000 रुपयांची नोट बदलू शकता. आरबीआयच्या घोषणेनुसार, 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांच्या नोटा एकावेळी बदलल्या जाऊ शकतात. आणि जर तुमचे बँक खाते असेल, तर तुम्ही एकावेळी कितीही 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकता.
  • तुमचे बँक खाते नसेल तर काळजी करू नका, तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकता. त्या बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक नाही. लक्षात ठेवा 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणालाही कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
  • जर एखाद्या बँक कर्मचाऱ्याने नोटा बदलण्यासाठी शुल्क मागितले तर तुम्ही बँक अधिकारी किंवा बँकिंग लोकपाल यांच्याकडे तक्रार करू शकता. आरबीआयच्या निर्देशानुसार 2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहे. म्हणजेच ते व्यवहारासाठी वापरता येते. मात्र ३० सप्टेंबरनंतर ते वैध राहणार नाही. लक्षात घ्या की RBI चा हा निर्णय देशातील प्रत्येक नागरिकाला लागू आहे, ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी बँकेत जाऊन 30 सप्टेंबरपूर्वी त्या बदलून घ्याव्यात.

हेही वाचा -

  1. Gold Silver Market : दोन हजार रुपये नोटबंदीनंतर ग्राहकांचा सोने-चांदी खरेदीकडे कल
  2. Shirdi Sai Baba : दोन हजार रुपये नोटबंदीनंतर साई संस्थान अलर्ट; भाविकांना केले 'हे' आवाहन
  3. Ban on 2000 notes : तुमच्याकडेही असेल 2 हजाराची नोट, तर काय कराल शेठ; जाणून घ्या नोट बदलीची प्रक्रिया
Last Updated :May 21, 2023, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.