बिहारमध्ये २ मुले अचानक झाली अब्जाधीश, बँक खात्यात 960 कोटींहून अधिक रक्कम जमा, असा घडला हा प्रकार

author img

By

Published : Sep 16, 2021, 6:27 PM IST

Updated : Sep 17, 2021, 2:53 PM IST

बिहारमध्ये दोन मुले अचानक झाले अब्जाधीश

शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या खात्यावर मोठी रक्कम जमा झाल्याने बँकेतील अधिकारी चक्रावून गेले आहेत. दुसरीकडे मुलांचे पालकही त्रस्त झाले. कटिहारचे जिल्हाधिकारी उदयन मिश्रा यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्राथमिक तपासानुसार तांत्रिक त्रुटीमुळे मुलांच्या खात्यात अधिक रक्कम दिसत आहे.

पाटणा- बिहारमध्ये लोकांच्या बँक खात्यांवर अचानक पैसे जमा होण्याचे सत्र सुरुच आहे. सुरुवातीला खगडिया नावाच्या तरुणाच्या बँक खात्यावर साडेपाच लाख रुपये जमा झाले. त्यानंतर कटिहार जिल्ह्यातील दोन मुलांच्या खात्यावर 960 कोटीहून अधिक रुपये जमा झाले आहेत. इतकी रक्कम खात्यावर जमा झाल्याने बँकेचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

कटिहार जिल्ह्यातील आजमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पस्तिया गाव आहे. या गावात राहणाऱ्या दोन शाळकरी मुलांच्या बँक खात्यांवर 960 कोटी रुपयांहून अधिक पैसे जमा झाले आहेत. उत्तरी बिहार ग्रामीण बँकेत खाते असलेल्या व सहावीत शिकणाऱ्या गुरू चरण विश्वासच्या खात्यावर 905 कोटीहून अधिक रक्कम झाली आहे. तर आशीषच्या बँक खात्यावर 60 कोटी 20 लाख 11 हजार 100 रुपये जमा झाले आहेत. हा प्रकार समोर येताच बँकेचे व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी दोन्ही मुलांच्या खात्यांवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. इतकी रक्कम बँक खात्यावर कशी जमा झाली, याबाबत तपास सुरू आहे.

हेही वाचा-संशयित दहशतवादी ओसामाने पाकिस्तानात घेतले 15 दिवस प्रशिक्षण; बापासह काकानेही केली मदत

तांत्रिक त्रुटीमुळे प्रकार झाल्याचा बँक अधिकाऱ्यांचा दावा

शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या खात्यावर मोठी रक्कम जमा झाल्याने बँकेतील अधिकारी चक्रावून गेले आहेत. दुसरीकडे मुलांचे पालकही त्रस्त झाले आहे. कटिहारचे जिल्हाधिकारी उदयन मिश्रा यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्राथमिक तपासानुसार तांत्रिक त्रुटीमुळे मुलांच्या खात्यात अधिक रक्कम दिसत आहे. मात्र, ही रक्कम मुलांच्या खात्यात जमा झाली नाही. त्याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले आहे.

हेही वाचा-Time Influential List: टाईमच्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता बॅनर्जी अन् आदर पूनावाला

असा प्रकार झाला उघडकीस-

गणवेशाची रक्कम मुलांच्या खात्यात किती जमा झाली आहे, हे अधिकारी तपासत होते. तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण बिहारमध्ये शाळकरी मुलांच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा-गुजरात: भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; जुन्या सर्व मंत्र्यांना वगळले!

जादा आलेले पैसे परत न केल्याने तुरुंगात रवानगी-

यापूर्वी खगडियामधील बख्तियारपूरमधील रंजीत राम याच्या खात्यावर साडेपाच लाख रुपये चुकीने जमा झाले होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी रंजीत राम याच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक खात्यावर पैसे पाठविल्याचे रंजीत राम याने सांगितले. बँक अधिकाऱ्यांनी वारंवार समजावून आणि नोटीस पाठवूनही त्याने पैसे परत दिले नाहीत. अखेर त्यांना अटक करून तुरुंगात पाठविले आहे.

Last Updated :Sep 17, 2021, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.